Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

किल्ले वैराटगड

 किल्ले वैराटगड 


वैराटगड हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील  गिरिदुर्ग आहे. हा गड समुद्रसपाटी पासून ३३४० फूट उंचीवर आहे. हा किल्ला साताऱ्यातील महाबळेश्वर डोंगररांगेत वसलेला आहे. वाई पासून ८ कि.मी. अंतरावर आहे. पुण्याहून साधारणपणे ९१ कि.मी. अंतरावर तर मुंबईवरून साधारणपणे २३७ कि.मी. आहे. वैराटगड 'शंभू महादेव ' या सह्याद्रीच्या उपरांगेत वसलेला आहे. 


गडाच्या पायथ्यापर्यंत बसने किंवा इतर गाडीने  येता येते. वैराटगडाजवळ पाचवड गाव आहे या गडावर जाण्यासाठी दोन  वाटा आहेत. पहिली उत्तरेकडून पाचवड - व्याजवाडी गावातून तर दुसरी गडाच्या दक्षिणे कडील सरताळे - गणेशवाडीतून जाणाऱ्या वाटेने हा गड खड्या चढाईचा आहे. त्यातल्या त्यात दक्षिण बाजूने गडावर जाणारी वाट थोडी सोयीस्कर आहे. 

गडावर जाताना अनेक पाण्याच्या टाक्या दिसतात. पुढे गडाच्या प्रवेशद्वार पर्यंत पोहोचतो. गडाला एका पाठोपाठ  दरवाजाचे अवशेष दिसतात. पुढे गेल्यावर सदर, वाडे, शिबंदीची घरे अश्या अनके बांधकामाचे ढिगारे दिसतात. गडावर हनुमानाचे मंदिर आहे. ह्या गडावर वैराटेश्वराचे मंदिर आहे. गडाची तटबंदी भग्न अवस्थेत असल्यातरी पूर्वी हा गड  भव्य असावा यांची कल्पना येते. 




गडमाथ्यावरून कृष्णा, वेण्णा नद्या तसेच पांडवगड, मांढरदेव, केंजळगड, रायरेश्वर, खंबाटकी, चंदन-वंदन, नांदगिरी, जर्डेश्वर, मेरुलिंग अशी विविध गिरिशिखरे दृष्टीस दिसतात. 

हा गडाचा इतिहास हा शिलाहार राजा भोजने हा  गड ११७८ ते ११९३ या काळात बांधला. प्राचीन वैराट उर्फ वैरत्नाग्री म्हणजेच आजची वाईचा पहारेकरी म्हणून त्याचे नाव वैराटगड. शिलाहारनंतर यादव, आदिलशाही, मराठा, मुघल व पुन्हा मराठा आणि शेवटी इंग्रज ह्यांच्या राजवटी कडे या गडाचे हस्तांतर झाले. 

जाण्याचा मार्ग

                    पुण्याहून  - मुंबई -पुणे - बेंगलोर हायवेने पाचवड 

                   मुंबईहून -   मुंबई -पुणे - बेंगलोर हायवेने पाचवड 

                     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा