पांडवगड किल्ला
पांडवगड किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे. हा गड समुद्र सपाटीपासून साधारण पाने १२४३ मी उंचीवर आहे. हा गड वाई जवळ असून महाबळेश्वर डोंगररांगेत आहे. वाई च्या पूर्व भागाला वैराटगड असून पश्चिम भागाला पांडवगड आहे. पुण्यापासून हा किल्ला साधारणपणे ९१ कि.मी. असून मुंबई पासून साधारणपणे २३४ कि.मी. दूर आहे.
ह्या गडावर येण्यासाठी दोन मार्ग आहेत. मुंबई -पुणे हायवेने वाईला यावे व वाईवरून मेणवली गावात येऊन गडावर जात येते तर दुसरा वै वाईवरून वाई - मांढरदेवी मार्गाने धावडी गावात येऊन गडावर येता येईल. धावडी गावात आल्यावर पायथ्याशी गाडी लावून गडावर जातात. गडाची चढाईची सुरवात होते. गडावर जाताना एक घर लागते. हे घर व चढाईची जागा ही खाजगी मालकीची असून त्या परिसराची देखभाल करण्यासाठी काही मुले तेथे ठेवलेले आहेत. गडावर जाताना त्या घरात आपली नोंद म्हणजे नाव पत्ता गडावर जाणाऱ्यांची संख्या त्याची नोंद करावी लागते.गडावर जाताना आपल्याला पाण्याच्या टाक्या दृष्टीस पडतात. गडावर जाताना गवत खूप वाढलेले असते त्यामुळे त्याचे काटे आपल्याला टोचतात साधारणपणे ४५ मिनिटाच्या चढाई नंतर आपण गडाच्या प्रवेशावर पोचतो,
ह्या गडाचे प्रवेशद्वार भग्न अवस्थेत आहे. प्रवेशद्वार गडाच्या उत्तर बाजूस आहे हा किल्लाची खूप पडझड झालेली आहे. प्रवेशद्वार पासून पुढे गेल्यास वाटेत पाण्याच्या टाक्या, हनुमानाचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर गडाची देवी पांडवजाई देवीचे मंदिर आहे. ह्या देवीच्या नावावर गडाचे नाव पांडवगड पडले आहे. गडाचा कडा नसर्गिक कातळाने असल्यामुळे गडाला फारशी तटबंदी नाही. गडावर शिवलींग व नंदी पांडवजाई देवीच्या मंदिर बाहेर आहे. हे शिवलिंग आणि नंदी हा पांडवजाई देवीच्या मंदिरा मागे असणाऱ्या महादेव मंदिर जे की भग्न अवस्थेत आहे. त्यातलेच असावे. ह्या गडावर चुन्याचा घाना आहे.
गडमाथ्यावरून धोम धरणाचे जलाशय, कमळगड, महाबळेश्वर व पाचगणीचे पठार दिसते. वाई, कृष्णा नदी, केंजळगड, मांढरदेव, चंदन वंदन व वैराटगड दिसतो
हा किल्ला राजभोज याने इसवी सन ११७८ ते ११९३ या कालखंडात बांधला असल्याची नोंद आहे. पुढे हा किल्ला आदिलशाहीत गेला शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६५३ मध्ये जिंकून स्वराजात आणला पुढे संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर हा किल्ला मोगलांकडे गेला परंतु संभाजी राजेंचे पुत्र शाहू महाराजांनी हा किल्ला जिंकूला व पुढे १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
मुंबई पुण्याहून एसटी ने वाईला यावे व वै वरून बसची खाजगी वाहनांची सुविधा आहे.
जाण्याचा मार्ग -
मुंबई हुन मुंबई - वाई - मेणवली
मुंबई - वाई - धावडी
पुण्याहून पुणे - वाई - मेणवली
पुणे - वाई - धावडी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा