मधुमकरंद गड
किल्ल्याच्या पायथ्याशी घोणसपूर गाव आहे व ह्या गावाच्या वरच्या बाजूनी गडावर जाण्यासाठी अरुंद अशी वाट आहे हि वाट घनदाट जंगलातून जाते. गडावर जाण्यासाठी साधारणपणे १ तास लागतो हा गाद दोन भागात आहे एक मधुशिखर आणि दुसरा मकरंदगड . गडाला जाताना नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या भोगोलिक बुरचनेचा उपयोग करण्यात आला उदा गडाचे प्रवेशद्वार नैसर्गिक रित्या तयार झालेल्या बुरुजात बनवलेले आहे. गडावर अनेक कातळात कोरलेले पाण्याचे तळ आहे. हे तळ फार प्राचीन काळी कोरलेली असावी. गडावर महादेवाचे मंदिर आहे. गडावर विशेष असे बांधकाम नाही. गडावरून अनेक गाद जसे प्रतापगड, वासोटा, रसाळगड, सुमारगड, माहिमनगड दिसतात ह्यामुळे हा किल्ला ह्या गडाचा एक दुवा असावा तसेच कोयना धरणाचे शिवसागर जलाशय व अभयारण्य दिसते.
हा किल्ला शिवाजीमहाराजांनी १६५६ मध्ये प्रतापगडच्या बांधणीच्या वेळी बांधला हा गड पुढे १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.
मार्ग - पुणे - महाबळेश्वर - घोणसगाव
मुंबई - महाबळेश्वर - घोणसगाव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा