किल्ले गुणवंतगड (मोरगिरी किल्ला ) 

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले गुणवंत हा सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील असून हा एक गिरिदुर्ग असून समुद्र सपाटी पासून १००० फूट उंचीवर आहे. गडाच्या पायथ्याशी मोरगिरी गाव असल्यामुळे ह्याला मोरगिरीचा किल्ला असे म्हणत असावेत. पुण्याहून हा किल्ला साधारण पणे १८४ कि.मी. अंतरावर असून मुंबई पासून हा किल्ला ३२६ कि.मी अंतरावर आहे. हा किल्ला बामणोली डोंगरावर आहे. सातारा जिल्ह्याच्या पाटण गावापासून साधारणपणे १० कि.मी. अंतरावर हा गड आहे. ह्या किल्ल्याच्या शेजारीच दातेगड आहे व ह्या दोन्ही गडमधून कोयना नदी आणि हेळवाक - पाटण रस्त्या जातो हा किल्ला भग्न अवस्थेत गडावर किल्ल्याची तटबंदी दिसत नाही. व ह्या इतिहास हि उपलब्ध नाही या गडावर फक्त एक विहीर आहे.व ३ ते ४ पाण्याचे टाक आहे. ह्या गडाचा वापर टेहळणी साठी किंवा सैन्यतळ म्हणून उपयोग केला जात असावा. हा किल्ला इ. स. १८१८ ला पेशवाई चा पाडाव इंग्रजांनी केला तेव्हा हा गड इंग्रजनाच्या ताब्यात गेला.
मार्ग - गुणवंत गड पाटण असून ३ ते ४ कि. अंतरावर
पुणे ते पाटण १७४. कि.मी. पाटण ते मोरगाव १० कि.मी.
मुंबई ते पाटण ३१६ कमी पाटण ते मोरगाव १० कि.मी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा