किल्ले सज्जनगड
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये सज्जनगड किल्ला सातारा जिल्यातील परळी तालुक्यातील असून हा एक गिरिदुर्ग आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारणपणे ३३५० फूट उंचीवर आहे अस्वलायन ऋषींचे हा डोंगरावर वास्तवाचे स्थान होते म्हणून त्यास अस्वलयानगड म्हणतात. पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव नावाने पूर्वीकडे जाते बया रांगेला तीन फाटे फुटतात त्यापैकी रांगेवर सज्जनगड हा किल्ला आहे. किल्ल्याचा आकार हा एक शंखाकृती आहे. पुण्य पासून परळी १२५ कि.मी. व मुंबई पासून २६६ कि.मी आहे.
ह्या किल्ल्याला दोन दरवाजे आहे एक छत्रपती महाराज द्वार व दुसरे समर्थ द्वार . ह्या किल्ल्यावर रामदास स्वामी यांची समाधी आहे. किल्ल्यावर मारुतीचे व गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या दरवाजात मारुती व वराहची मूर्ती आहे प्रवेश द्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर असून मंदिरा लगत अशोकवन वेणाबाई वृदावन, ओवऱ्या, अक्काबाईचे वृंदावन आणि समर्थांचा मठ या वास्तू आहेत. राममंदिर व मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाजायने पश्चिमेस गेल्यास उजव्या हातास एक चौथरा आहे व शेकरु फासलेला गोटा आहे त्यास ब्रम्हपिसा म्हणतात. गडाच्या पश्चिमेच्या टोकावर मारुती मंदिर अशे त्याला धाब्याचा मारुती असे म्हणतात. तसेच गडावर गावमारुती व कल्याण स्वामींचे मंदिर आहे. तसेच रामघळ हुह आहे. सज्जनगडाच्या पायथाशी परळी गावंलागेतच केदारेश्वर व विरुपाक्ष अशी दोन प्राचीन मंदिर आहेत व कुसगावापासून जवळच मोरगळ नावाची गुहा आहे.

ह्या किल्ल्याची उभारणी ११ व्या शतकातील असून शिलाहार वंशातील राजभोज राजाने केले गेली असा इतिहास आहे. पुढे १६७३ मध्ये शिवरायांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकला व त्याचा समावेश स्वराजात केला. इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींनी ह्या गडावर देह ठेवला पुढे २१ एप्रिल ए.स. १७०० मध्ये फत्तेउल्लखाने सज्जनगडास वेढा घातला व ६ जून १७०० मध्ये ताब्यात घेतला व त्याचे नाव नवरसातारा ठेवले. परंतु १७०९ रोजी मराठयानी हा गड पुन्हा जिंकला व इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
मार्ग - ह्या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) परळीपासून - साताऱ्यापासून ते परळी अंतर १० कि.मी. चे आहे. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
२) गजवडीपासून - साताऱ्यापासून गजवाडी ७ कि.मी आउंटावर तेथून थेट गडाच्या कातळ मोथ्या पर्यांतगाडीने जात येते
साताऱ्यापासून एस. टी ने परळी पर्यंत व गाजवादी पर्यंत येता येते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा