किल्ले महिमानगड
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती किल्ले महिमानगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटी पासून साधारणपणे ३२०० उंचीवर हा किल्ला आहे. सातारा - फलटण डोंगररांगेतजील हा एक किल्ला आहे. हा किल्ला साताराहुन ५० कि.मी. अंतरावर तर पुण्याहून साधारणपणे १६५ कि.मी अंतरावर तर मुंबई पासून साधारणपणे ३१० कि.मी अंतरावर हा किल्ला आहे. महिमान गावाच्या दक्षिण पायथ्याशी महिमान गाद वाडी आहे. व उकिरडकडूनहि गडाला जायचा मार्ग आहे. हा मार्ग थोडा अवघड आहे. महिमान गडाच्या फाट्यापासून गडाचा पायथा असलेल्या गाव पर्यंत गाडीने जात येते. महिमानगड वाडी उतारावर वसलेली आहे. वाडीतील मंदिरपासून गडावर जायला एक वाट आहे. बया वाटेवरूनच गडाच्या दरवाजचे बुरुज दिसतात. या वाटेने वर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीत पाण्याची टाकी कोरलेली आहे. पुढे गडात शिरणारा मार्ग दिसतो इथल्या तटबंदी वर अनेक झाडे उगवली दिसतात त्यामुळे दरवाजाची कामं ढासळून नष्ट झाली आहे. फक्त कमानीचे उभे खांब शिल्लक आहेत. या दगडांच्या खांबावर सुरेख हत्ती कोरलेले आहे. दरवाजाची बांधणी गोमुख पध्द्तीची आहे. दरवाजातून आत प्रवेश केल्यास डावीकडील वाट गडाच्या मान्यवर जाते. तटबंदीला अनेक बुरुज आहेत. गडाचा पश्चिम भाग रुंद असून तो पूर्वेकडे निमुळता होत गेलेला आहे. व त्या टोकावर टेहळणीसाठी एक बुरुज आहे. या तटबंदीला दोन दिंडी दरवाजे आहेत गडाच्या मथयवरून भूषणगड, वर्धनगड हे किल्ले दिसतात व मोळघाट परिसर दिसतो.
ह्या किल्ल्याचा उपयोग साताऱ्याच्या पूर्वकडील प्रांताचे संरक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे केले घेतले व बांधले त्या किल्ल्या पैकी एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरिता महार रामोशी मिळून ७५ इसम गडावर ठेवले होते. किल्ल्याचा हवालदार पाहणी सबनीस यायची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुलकर्णी यांच्याकडे चालू आहे.
मार्ग - साताऱ्याहून माहिमगड ५० कि. मी. असून सातारा पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या पुचे १२ कि.मी. अंतरावर असणाऱ्या महिमानगड फाट्यापासून पुढे जातो. दहिवडी कडून साताऱ्याकडे येणाऱ्या रस्त्यावरून सुद्धा महिमानगड फाट्यावर उतरता येते. महिमानगड फाट्यावरून महिमानगड गावात २० मिनिट लागतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा