किल्ले संतोषगड
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये संतोषगड हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे. हा किल्ला पुण्यापासून १६० कि. मी. असून मुंबईपासून ३१० कि.मी. आहे. हा किल्ला समुद्रसपाटी पासून साधारणपणे २९०० फूट उंचीवर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी ताथवडे गाव आहे. त्यामुळे त्या ताथवडेचा किल्ला असे म्हणतात. सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागामध्ये विभागलेली आहे. शंभू महादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग या पैकी म्हसोबा डोंगर रांगेवर हा किल्ला आहे. साताऱ्यापासून ५५ ते ६० कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला आकाराने छोटा आहे हा किल्ल्याचा उपयोग फलटण भागावर टेहळणी साठी केला जातो.
ताथवडे पायथ्यावरील गाव असून त्या गावात एक मंदिर आहे. त्या मंदिरावरून असे समजते कि किल्ला १६६२ मध्ये शिवाजी महाराजांनी बांधला आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गावर एक मठ आहे व मठाच्या बाजूला एक गुहा असून त्यात वाल्मिकी ऋषींची मूर्ती आहे पुढे किल्ल्याच्या दरवाजा किल्ल्याचा दरवाजाची पडझड झाली असून पहारेकऱ्यांच्या देवड्या मात्र शिल्लक राहिले आहेत दरवाजाच्या पुढे गेल्यावर मात्र हनुमानाचे टाक आहे व पुढे गेल्यावर वाड्याचे व घराचे अवशेष आहेत. व पुढे धान्याचे कोठार आहे. ह्या धान्याच्या कोठाराच्या फक्त भिंती उभ्या राहिले आहे. पुढे गेल्यास पाण्याचे टाक असून टाक्यात उतरण्यासाठी चक्क कातळ भिंडीला भोक पाडून पायऱ्या केल्या आहेत. किल्ल्याची तटबंदी सुस्थितीत आहे. गडाच्या वाट महाद्वाराच्या कमानी पडक्या विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्याना पायबंद बसावा यासाठी ह्या गडाची उभारणी केली.
हा किल्ला शिवाजी महाराजांनी १६६६ साली बांधला असून तो नाईक निबाळकर याच्याकडे किल्ल्याची सूत्रे हाती दिली. परंतु त्याच वर्षी पुरंदरच्या तहात हा गड मोगलांकडे गेला परंतु राजकर्त्याने हा गड त्याच्या ताब्यात घेतला शिवाजी महाराजांनी हा गड त्याच्या ताब्यात घेतला शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६७३ मध्ये मुघलांनी पुन्हा हा गड जिंकलं. पुन्हा हा किल्ला १७२० रोजी शाहू महाराजांच्या हाती दिला. पुढे १८१८ साली हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा इंग्रजांनी ह्या गडाची भरपूर नासधूस केली गेली.
मार्ग - किल्ल्यावर जाण्यसासाठी फलटण व सातारा दोन्ही शहरातून जात येते.
ताथवडे - ताथवडेला अनेक मार्गानी पोहचला येते फलटण ते ताथवडे अशी एस. टी हे अंतर १९ कि.मी. आहे.
सातारा - साताऱ्याहून पुसेगाव साधारणपणे २३ कि.मी. आहे. मोळघाट मार्ग फलटणला जाणाऱ्या बसने ताथवडेला उतरता येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा