Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

बुधवार, १ एप्रिल, २०२०

किल्ले अजिंक्यतारा

                          किल्ले अजिंक्यतारा
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये  अजिंक्यतारा हा गाद सातारा जिल्ह्यातील सातारा शहरात असून सातारा शहरापासून ३ कि. मी. अंतरावर आहे. पुण्याहून साधारणपणे ११८ कि. मी. तर मुंबईहून २५९ कि.मी. अंतरावर आहे. हा एक गिरिदुर्ग असून समुद्रसपाटीपासून साधारणपणे ४४०० फूट उंचीवर अशे हा किल्ला बामणोली डोंगररांगेत आहे हा किल्ल्या सातारा शहरात असल्याने सातारा एस. टी स्थनांकापासून अदालतवाड्या मार्गे जाण्याऱ्या कोणत्याही  अदालत वाड्यापाशी उतरून किल्ल्यावर जातात येते. व तसेच सातारा - राजवाडा अशी बससेवा दर १०-१५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बसस्थानका पासून अदालत विद्यापर्यत चाल जावे लागेल अदालत वाड्यापासून साधारणपणे १ कि.मी. चालत गेल्यास गडाच्या दरवाजापाशी पोहचतो.

गडावर प्रवेश केलेल्या मार्गावर दोन दरवाजे आहेत. व दोन वुरूज दृष्टीस पडतात. दरवाज्यातून आत गेल्यावर हनुमानाचे मंदिर आहे व थोडे पुणे गेल्यावर महादेवाचे मंदिर आहे. गडावर प्रसारभारती चे कार्यालय आहे व मागे पँझरबार्टीचे टॉवर आहे. थोडे पुढे गेल्यावर मंगळादेवीचे मंदिर व मंदिरापुढचं मंगळा बुरुज आहे. गडाच्या तटबंदीवरून फिरत येते गडाच्या दुसऱ्या बाजूस सुद्धा दोन दरवाजे आहेत. त्या दरवाज्या जवळच पाण्याचे नवीन तलाव आहेत परंतु त्यांना उन्हाळ्यात पाणी नसते.
गडावरून यव्तेश्वरचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो.
ह्या गडाचा इतिहास पहिला तर सातारा किल्ला उर्फ अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी होय. हा कोलला शिलाहार वंशातील दुसऱ्या भोज राजाने इ.स. ११८० मध्ये बांधला पुजेधे हा किल्ला बहमनी सत्तेत व पुढे विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ. १५८० पहिल्या आदिलशाही पत्नी चाँदबिबी येथे कैदेत होती. १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजीमहाराजांनी जिंकून स्वराजात सामील केला शिवाजीराजांच्या मृत्यू नंतर हा किल्लाला औरंगज़ेबाने वेढा दिला व १७०० मध्ये तब्ब्ल ४ महिनेच्या लढ्यानंतर हा किल्ला दुघलाईनच्या ताब्यात गेला व ह्या किल्ल्याचे नाव जम्तर ठेवले. पुढे ताराराणी सैन्याने हा किल्ला पुढे जिंकलं व त्याचे नाव पुन्हा अजिंक्यतारा ठेवले. पुढे हा किल्ला पुन्हा मुघलच्या ताब्यात गेला तेव्हा शाहू महाराजांनी पुन्हा हा किल्ला घेतला व १७०८ रोजी त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक केला.  या गडावरून कारभार पाहताना छत्रपती शाहूंनी सातारा शहराची स्थापना केली. पुढे मात्र १८१८ रोजी हा किल्ल्या इंग्रजांच्या ताब्यात गेला
मार्ग - पुणे- सातारा  एस टी किंवा खाजगी वाहनाने
         मुंबई - सातारा  एस टी किंवा खाजगी वाहनाने
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा