कमळगड ( कातळगड )

तुपेवाडी हि गडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांपैकी एक. हे गाव ३०कि.मी वाई वरून तर ४६ कि.मी भोरवरून गडावर चढाईचा मार्ग तुपेवाडी दक्षिण बाजूने चालू होतो हा मार्गे सोपा व सुरक्षित आहे. हा मार्ग दोन्ही बाजूने झाडाने वेढलेला आहे. हा मार्ग आपल्याला कमलमाची पर्यंत पोहचवतो. ह्या माचीवर जांभूळाच्या झाडी आहेत. वरती एक लोणगाव आहे. ते गावकरी आपल्या राहण्याची व जेवण्याची सोय कमी दरामध्ये करतात. येथून २० मिनिटातच गडाच्या बालेकिल्ल्यावर पोचतो. बालेकिल्ला सभोवती असलेल्या जंगलपेक्षा ३० ते ४० फूट उंचीवर आहे. हा गड ३-४ एकर पठारावर पसरलेला आहे गडावर कोणतेही वास्तू नाही कोणता बुरुज किंवा महाल आणि दरवाजा सुद्धा नाही उंच व खोल दगडच या गडाचे तटबंदी आहे.

गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. त्याला नवरा नवरी चे डोंगर म्हणतात. पुढे ४०-५० फूट रुंद भुयार आहे. व त्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहे. तिला गेरूची अंडी कवीची विहीर म्हणतात ह्या विहिरीच्या ५०- ५५ पायऱ्या उतरल्यावर तळाशी पोहचतो तळाच्या चोहूबाजूस खोल कपारी असून सर्वत्र गेरू आणि काव याची ओलसर माती आहे हे सोडल्यास गडावर कोणतेही अजून टाक नाही
गडावरून केंजळगड, रायरेश्वराचे पठार, काळेश्वराचे पठार, पाचगणी, धोम धरण दृष्टीस पडते.
मार्ग -
महाबळेश्वरहुन केट्स पॉईंटवरून खाली येणाऱ्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोऱ्यात उतरते कि सुमारे दोन तासात समोरच्या डोंगरउतारावरील नांदवणे गावी पोहचता येते व त्या वस्तीवरून दोन अडीच तासात कमळगडावर पोहचतो.
वाई - वाईहून नंदवणे गावी येण्यास एस. टी आहे
पुणे - पुणे ते वाई ९० कि. मी. व वाई वरून नांदवणे गाव
मुंबई - मुंबई तेवाई २३० कि. मी. व वाई वरून नंदवणे गाव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा