Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

किल्ले केंजळगड

                            किल्ले केंजळगड

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये केंजळ्गड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग असून त्यांची उंची ४२६९ फीट आहे. केंजळगड हा कृष्णा व नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एक डोंगरवार आहे त्याला महादे डोंगररांग हि म्हणतात. ह्या गडाच्या एक बाजूला धोम येथे कृष्णा धरण तर दुसरा बाजूला नीरा नदीवर देवघर धरण व जवळच रायरेश्वर, रोहिडा, कमळगड हे किल्ले दिसतात. ह्या किल्ल्याचे पठार लहान आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार पडलेल्या अवस्थेत असून इंग्रजांनी ह्या किल्ल्याची भरपूर नासधूस केली आहे. गडावर केंजळादेवीचे मंदिराचे अवशेष आहे. व  दोन चुनाभट्टी आहेत. व गडावर ३ मोठया व ६ लहान पाण्याच्या टाक्या आहेत.


इतिहासानुसार हा किल्ला पन्हाळच्या भोज राजाने १२शतकात बांधला पुढे तो १६४८ साली बिजापूरचा आदिलशाहने जिंकला. छत्रपती शिवाजीराजांनी वाई व भोर भागातील बहुतेक किल्ले जिंकले परंतु हा किल्ला खूप काळ स्वराजात नव्हता. पुढे १६९४ रोजी चिपळूणच्या मोहिमेच्या वेळेला हा किल्ला जिंकला पुढे १७०१ रोजी औरंगज़ेब याने हा गड जिंकला. १७०२ लाच हा गाद मराठ्यांनी हा गड पुन्हा स्वराजात आणला पुढे १८१८ ला जेव्हा पेशवचा पाडाव झाला तेव्हा हा गड सुद्धा जिंकला.


हा किल्ल्या वाई वरून २५ कि.मी. रस्त्याने आहे. तर भोरवरून रस्त्याने १७ कि.मी. आहे ह्या गडावर जवळील मार्ग हा पायथ्यशी असणाऱ्या घेरा केंजळ या पासून अर्धा ते एक तासात या गडावर पोचवतो ह्या गडावर तिन्ही ऋतूमध्ये जात येते.
मार्ग - मुंबई -सातारा -कोल्हापूर महामार्गावरून साताऱ्याच्या वाई व वाई च्या पुढे १८-२० कि.मी अंतरावर एस ती ने जीप ने किंवा खाजगी गाडीने खावली या गावातून केंजळगडास जाण्याचा मार्ग आहे. महाराष्ट्र सरकारने गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाण्यासाठी रस्ता बनवला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा