किल्ले मनोरंजन (राजमाचीचा बाल्लेकिल्ला )
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले मनोरंजन दोन बालेकिल्ल्या पैकी एक आहे. पुण्यातील मावळतालुक्यात असून लोणावळ्याच्या बोर घाटात असून हा के गिरिदुर्ग आहे. हा किल्ला समुद्रसपाटी पासून २७०० फिट उंचीवर आहे. राजमाची लोणावळ्या पासून १५ कि. मी. अंतरावर आहे. लोणावळ्यावरून चालत चालत तीन ते साडे तीन तास लागतात व कोंढाणे गावा मार्गे आल्यास मात्र ट्रेकिंग करून दोन तासात राजमाचीला पोचता येते. पावसाळ्या व्यतिरिक्त इतर काळात लोणावळ्या पासून उधेवाडी पर्यंत टाटा सुमो, महेंद्रा बुलेरो या सारख्या गाड्या ज्या उंचीने जास्त आहे. ते गडाच्या पायथ्याशी असणारे उधेवाडी पर्यंत जाता येते. मारुती ८०० किंवा इंडिका ह्या सारख्या गड्याने उधेवाडी पर्यंत येऊ नये. राजमाची गडाच्या पायथ्याशी कोंढाणा लेणी असून ती इ. स. २०० पूर्वी राजमाची गडाच्या अधिपत्ते खाली झाली असावी त्या वरून ह्या गडाचे निर्माण आणि महत्व आपणास समजते.
उढेवाडीत आल्यावर तुम्हाला उदयसागर तलाव दिसतो व पुढे गेल्यावर गोधनेश्वर मंदिर दिसते. गावातून मनोरंजन किल्ल्यावर जाण्यासाठी तास ते सव्वा तास लागतो. राजमाची गडाला दोन बालेकिल्ले आहेत. श्रीवर्धन आणि मनोरंजन ह्या किल्ल्याच्या पायथाशी कालभैरवाचे मंदिर आहे.
मनोरंजन हा किल्ला श्रीवर्धन किल्ल्यापेक्षा कमी उंचीवर असून तो आकारमानाने सुद्धा छोटा आहे. प्रवेशद्वाराने आत प्रवेश केल्यास सैनिकाच्या दोन दिवड्या आहेत. गडावर चार पाण्याचे टाक हाये. गडावर अनेक वास्तूचे अवशेष दिसून येतात गडावरुन माथेरान डोंगररांगेचा ढाक किल्ला, भीमाशंकर किल्ला कर्नाळा, प्रबळगड दिसतात
ह्या किल्ल्याचे महत्व म्हणजे कल्याण नरसोपारा बंदराचा माल बोर घाट मार्गे जायचा या मार्गावर लक्ष राहण्यासाठी तसेच महसूल लीच्या दृष्टीने ह्या गडांचे महत्व ओळखून शिवाजी राजांनी सण १६५७ रोजी कल्याण व भिविण्डी परिसर व बोर घाटतील सर्व किल्ले स्वरजात सामील केले पुढे हा किल्ला कित्येक काळ मराठा साम्राजचा भाग होता इ.स. १७१३ रोजी शाहू महाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या कडे दिला. १७३० रोजी हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्या कडे हा किल्ला आला व पुढे इ.स. १७७६ ला सदाशीवराव तोतया यांनी समस्त कोकण प्रांत काबीज केला तेव्हा त्याने हा किल्ला हि ताब्यात घेतला व कोकणात वर्चस्व वाढवले परंतु पुढे पेशवाणी हा किल्ला परत काबीज केला पण पुढे १८१८ रोजी इंग्रजांनी हा किल्ला जिंकला
मार्ग - पुणे ते राजमाची 85 कि.मी. लोणावळा पर्यंत रेल्वेने व पुढे चालत किंवा भाड्याने
मुंबई ते राजमाची ९५ कि.मी. लोणावळा पर्यत रेल्वेने व पुढे चालत किंवा भाड्याने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा