तुंगकिल्ले
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले तुंग म्हणजेच कठीणगड हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक किल्ला आहे. हा एक गिरिदुर्ग असून त्याची समुद्रसपाटीपासून अंदाजे १०७५ मी. आहे. पुण्यापासून साधारणपणे ६० कि. मी तर लोणावळ्या पासून साधारणपणे २० कि. मी. अंतरावर आहे. मळवली पासून साधारणपणे १२ कि. मी. अंतरावर आहे. ह्या गडाच्या तिन्ही बाजूने पवना धरणाचे जलाशयने वेढलेला असून ह्या जलाशयात विविध वॉटर ऍक्टिव्हिटीएस चालू आहे. गडाच्या पायथ्याशी तुंगवाडी हे गाव आहे. ह्या गावापासून ४०० मी ची चढाई करून ह्या गडावर पोचता येते.
हा गडा कॉनिकल शेप असून तीव्र उताराच्या खोल दऱ्या आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी ह्या गडाचे नाव बदलून कठीणगड केले असावे. ह्या गडावर चढताना अनेक गृहा आहे. प्रवेशद्वार नंतर दुसरा प्रवेशद्वार हा गोमुखी पद्धतीचा बांधकाम असलेला आहे. आत गेल्यावर गणेश मंदिर आहे. त्यापुढे गेल्यावर शिवकालीन पाण्याचे तळ आहे. अजून पुढे गेल्यावर न्यायनिवाडा करण्याची जागा आहे. या गडावर अनेक महालाचे अवशेष आहे. किल्ल्यावर तुंग देवीचे मंदिर आहे. ह्या देवीवरून ह्या किल्ल्याचे नाव तुंग गड पडले असावे. किल्ल्यावर चार बुरुज असून छोटीखानी बालेकिल्ला पडक्या अवस्थेत आहे. ह्या बालेकिल्ल्यावरून लोहगड, विसापूर, तिकोना, कोरीगड दिसेल.
ह्या गडाच्या इतिहासाप्रमाणे इ. स. १६०० च्या काळात आदिलशहाने ह्या गडाचे निर्माण केले शिवाजी महाराजांनी १६५७ च्या आसपास जेव्हा भिविण्डी व कल्याण परिसर जिंकला तेव्हा हा गड स्वराजात आला. हा किल्ला नेताजी पालकरांच्या ताब्यात दिला परंतु पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला परंतु ५ वर्षातच हा गड पुन्हा स्वराजात आला. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा किल्ला औरंगझेबाच्या ताब्यात गेला परंतु त्याच्या मृत्यू नंतर मराठ्यांनी तोच पुन्हा जिंकून स्वराज्यात आला.
हा किल्ल्या छोटा असून ह्यामध्ये २०० सैनिकच राहू शकतात. त्यामुळे हा किल्ला मुख्य करून टेहळणी साठी वापरण्यात येत असावा. ह्या किल्ल्यावरून बोरघाट मार्गी येणाऱ्या शत्रूवर नियंत्रण व लक्ष ठेवण्यासाठी वापरत असत व तसेच मुळशी व मावळ प्रांतातील परिसराचे व तसेच लोहगडाच्या संरक्षण करण्यासाठी होता. अससी हा किल्ला पाहण्यासाठी तसेच पवना धरणाचे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी एकदा तरी ह्या गडाला भेट द्या पण गडावर चढाई करताना विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
मार्ग - लोणावळ्या मागे २० कमी रस्त्याच्या मार्गाने यावे लागेल.
पुणे मार्गे ६० कमी रस्त्याने यावे लागेल .
पुण्या-मुंबईवरून रेल्वेने मळवली स्टेशन ला उतरून १२ कि. मी. रस्त्याने यावे लागेल
तुंग गावात यावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा