Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

सोमवार, ३० मार्च, २०२०

किल्ले रोहिडगड( विचित्रगड )

                     किल्ले रोहिडगड( विचित्रगड ) 

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये रोहिडगड उर्फ विचित्रगड हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून हा किल्ला समुद्रसपाटी पासून ३६६० फीट उंचीवर आहे. हा एक गिरिदुर्ग आहे. पुण्यापासून साधारणपणे ६० कि.मी. अंतरावर आहे. गडाच्या पायथ्यशी बाजारवाडी हे एक गाव आहे. हे गाव भोर पासून साधारणपणे ७ कि.मी. अंतरावर आहे. बाजारवाडी पर्यंत एस टी ची सोय असून खाजगी वाहनाने सुद्धा जाता येते. गडावर जाताना भोर मध्ये हॉटेल्स उपलब्ध आहे. बाजारवाडीला सुद्धा तुम्हाला छोटे छोटे हॉटेल्स आहे. तेथे तुम्ही नास्ता करून शकता.
गडाची चढाई बाजारवाडीच्या हायर सेकंडरी शाळे पासून गडावर चढाई सुरु होते. हा मार्ग सोपा व सोयीचा आहे. ह्या मार्गाने साधारणतः तासभर चढाई नंतर तुम्ही गडाच्या प्रवेशद्वार पर्यंत पोचता. त्यावर गणेश पट्टी व मिहरब आहे. काही पायऱ्या चढल्यावर गडाचे दुसरा दरवाजा लागतो. ह्या दरवाजा जवळच एक पाषाणात कोरलेले पाण्याचे ताक आहे. दुसऱ्या दरवाजाचे सिंह व शरबाचे शिल्प कोरलेले आहे. काही पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा तिसरा दरवाजा लागतो. ह्या दरवाज्यावर हत्तीचे शिल्प आहे व दुसऱ्या बाजूस मराठी व पारशी भाषेत शीला लेख आहे. या गडावर दोन वास्तू  सदर तर दुसरी किल्लेदाराचे घर असावे. पुढे गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैरोबाचे मंदिर व त्यासमोर लहानसे टाक व एक दीपमाळ आहे. हा किल्ला तसा आकाराने लहान आहे. हा किल्ल्याला एकूण ६ बुरुज आहेत. शिरवळ, पाटणे, दामगुडे , वाघजाई, फत्ते व सदरेचा बुरुज
आहे.




ह्या किल्ल्याचा इतिहास पाहता हा यादवकालीन असून तिसऱ्या दरवाजावरील शिलालेखानुसार बिजारपूरचा मोहम्मद आदिल शाह याने गडाची पुनबांधणी केली. १६५६ साली हा किल्ला शिवाजी महाराजांनी रोहिडाचे देशमुख बांदल ह्यांना धारातीर्थी पडून स्वराजात सामील करून घेतला. देशमुख बांदल हयांचे वरिष्ट अधिकारी बाजीप्रभू देशपांडे यांना स्वराजाच्या मोहिमेत सामील करून घेतले. पुढे  १६६५ रोजी पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलच्या ताब्यात गेला परुंतु १६७० रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराजात सामील करून घेतला.




मार्ग - या गडावर जाण्यासाठी दोन बाजूनी मार्ग आहेत. एक बाजारवाडी मार्गे तर दुसरा चिखलावडे मार्ग
चिखलावडे मार्गातून जाताना दोन मार्गे आहेत पण ते घोडे अवघड आहेत. ट्रेकसाठी या मार्गाचा उपयोग करतात.

   १) बाजारवाडी मार्ग - बाजारवाडी पर्यंत जाण्यासाठी एस टी सेवा उपलब्ध आहे बाजारवारी पासून मळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून प्रवेश द्वारपर्यंत तास भरात घेऊन जाते. गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करतात. ती वाट लॅबची व निसरडी या वाटेने गडावर जाण्यास अडीच तास लागतात.
   २) चिखलवाडे मार्ग - चिखलवे खुर्द येथून टप्प्याचे नाकडं मार्ग किंवा चिखलावे ब्रुद्रुक येथून भैरवनाथ मंदिर मार्ग या गडावर जात येते हा मार्ग कठीण आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा