Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

बुधवार, २५ मार्च, २०२०

किल्ले तोरणा

                                                                        किल्ले तोरणा 




महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असून पुण्यापासून ४० कि.मी आहॆ ह्या गडाची उंची १४००  मी. आहे . हा किल्ला स्वराज्याच्या मोहिमेतील सर्वात महत्वाचा किल्ला आहॆ. म्हणून असे ही म्हणतात तोरणा किल्ला जिंकून महाराजांनी तोरण उभारले. शिवाजीराजांनी वयाच्या १६ वर्षी हा गड सर केला. ह्या गडावर तोरण नावाची झाडे आहेत त्या वरून त्याला तोरणा असे नाव पडले आहे. ह्या किल्ल्याच्या प्रचंड विस्तारामुळे महाराजांनी या गडाचे नाव प्रचंडगड असे नाव पडले. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बह्मणि राजवटीच्या मलिक अहमद याकडे हा किल्ला होता नंतर तो निजामशाहीत गेला पुढे १६४३ साली शिवाजीमहाराजांनी वयाच्या १६ वर्षी हा किल्ला घेतला व ह्या गडाची पुनः बांधणी केली नवीन इमारती बांधल्या संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्यानंतर हा किल्ला मुघलांकडे गेला सण १७०४ रोजी औरंगजेब कडे गेला पंरंतु काही वर्षातच नागोजी कोकाटे यांनी या मराठा सरदाराने पुन्हा हल्ला केला व मराठ्यांच्या ताब्यात घेतला.

गडावरून कनद नदीवरचे गुंजवणे धरणाच्या पाणी दिसते. हा किल्ला कोणी व कधी बांधला गेला ह्याची पुरावा उपलब्ध नाही परंतु या किल्ल्यावर प्राचीन काळाच्या लेण्या आहेत त्या किल्ल्यापेक्षा खूप जुन्या आहॆत. ह्या  किल्ल्यावरून रायगड, राजगड , लिगांणा, पुरंदर, सिहंगड दिसू शकतात. गडावर येण्यासासाठी पायऱ्या आहेत तो दगडकोरून केल्याला दिसतात. गडाचा मुख्य दरवाजा आहे पुढे दुसरा दरवाजा मुखी दरवाजा आहे हा दरवाजा गोमुखी दरवाजा आहे. गडावर काही जुने अवशेष आहे गडावर पाण्याचे एक तळ आहे गडावर मोंगाई व शंकराचे मंदिर आहे. गडाच्या कोकणच्या दरवाज्यावरून बुधला माची कडे जात येते. झुंझार माची कडे जाण्यासाठी लोखंडी शिडीद्वारे जावे लागते. ह्या माची कडे जाण्याचा मार्ग अवघड आहे.


पोहोचण्याचे मार्ग : पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वेल्हेला जाण्यासाठी मुंबई - बंगलोर हायवे वरील नसरापूर फाटा गाठावा. पुण्यापासून नसरापूर ४० किमी वर आहे. नसरापूर वरून वेल्हे गावात जाण्यासाठी जीप मिळतात. नसरापूर ते वेल्हे हे अंतर २९ किमी आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा