किल्ले लोहगड

गडावर गेल्यावर सर्वप्रथम गडाचा प्रवेश द्वार 'गणेश' दरवाजा पाहावयास मिळतो. दुसरा दरवाजामहादरवाजा असून त्यानंतर तिसरा दरवाजा दिंडी दरवाजा आहे. चौथा दरवाजा नारायण दरवाजा आहेव पाचवा दरवाजा हनुमान दरवाजा आहे. गडाच्या भक्कम तटबंदीमुळे ह्या गडाला 'लोहगड' असे नाव पडले. गडावर अष्टकोनी व सोळाकोनी तलाव आहे. शिवकालीन सभागृह आहे. महादेवाचे मंदिर, त्र्यंबक तलाव लक्ष्मी कोटी आहे. घोड्याच्या पागा आहे गडावर एकूण ४० पाण्याच्या टाक्या आहे. विंचू कडा हा आकर्षक व निसर्गरम्य आहे.

लोहगड खूप प्रचीन असून सातवाहन, यादव, चालुक्य, राष्ट्रकूट, निजाम बहमनी, मुगल, मराठा ह्या सत्ता कर्त्यांनी ह्या गडावर राज्य केले आहे. गडावर त्याच प्रमाणे गडाच्या भोवती अनेक लेण्या अस्तित्वात आहे त्यामुळे हा गड किती प्राचीन असावा ह्याचा अंदाज काढता येईल.
मलिक अहमदने निजाम शाहीची स्थापना करताना लोहगड किल्ला काबीज केला सण १६३० साली हा किल्ला आदिलशाहीत गेला. व पुढे१६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड-विसापूर हा सर्व परिसर स्वराज्यात सामील करून घेतला पण १६६५ साली पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला. पुढे १६७० साली मराठ्यांनी पुन्हा हा गड जिंकून स्वराजात सामील करून घेतला. पुढे सण १८१८ मध्ये पेशवांकडून हा किल्ला इंगर्जांच्या ताब्यात गेला.
मार्ग - पुण्यावरून किंवा मुंबई वरून मळवली स्टेशन वरून चालत जाताना साधारणतः दिड सव्वा तास लागेल. गायमुखी खिंडीच्या अलीकडे लोहगडवाडी तुन किल्ल्याच्या मार्गाने जाता येते.
खाजगी वाहनाने जायचे झाल्यास गडाच्या पायथ्याला लोहगडवाडी पर्यंत जाता येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा