Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

किल्ले हडसर (पर्वतगड)

                        किल्ले हडसर (पर्वतगड)

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये हडसर किल्ला उर्फ पर्वतगड  पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून समुद्रसपाटी पासून ४६८० फीट आहे. पुण्यापासून साधारणपणे १०५ कि.मी. असून मुंबई पासून १५६ कि.मी आहे हडसर हे या गडाच्या पायथ्याशी असणारे गाव आहे. जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवडा यापैकी कोणतीही बस पकडून तासाभरात हडसर या गावी जात येते. हडसर गावातून डोंगरापर्यंत जाताना लागलेला पठारावरून ह्या किल्ल्याची तटबंदी दिसते साधारणपणे अर्धा तास चालून गेल्यावर बुरुजापर्यंत पोहचता येते व थोडी चढाई करून किल्ल्याच्या द्वारा पर्यंत पोचता येते. व थोडी चढाई करून किल्याच्या द्वारापर्यंत जाताना डोंगरकरपर्यंत कोरलेल्या दोन टाक दिसते पुढे वळण घेऊन १०० पायऱ्याचढून खिंडीच्या मुख्य दरवाजापाशी पोहचता येते. हि राजदरवाजाची वाट आहे. हा दरवाजा बोगदे वजा प्रवेशमार्गावरची उत्कृष्ट नमुना दरवाजाची दुक्कल नलोन खोदलेल्या पायऱ्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वार आहें. गडावरील मुख्य दरवाजातून दोन वाटत फुटत. एक वाट तोडावेत जाते तर दुसरी प्रवेश द्वाराकडे जाते. दुसऱ्या दरवाजातून वरती आल्यावर पाण्याचे एक ताई आहे. त्याच्या डावीकडे वळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्थ कोठारे दिसतात. त्याच्या बांधकामावर गणेश प्रतिमा कोरलेल्या हायेत तेथून उजवीकडे वळल्यास मोठा तलाव लागतो व पुढे महादेवाचे मंदिर हि लागते मंदिराच्या समोरच भक्कम बुरुज आहे व एक तलाव आहे व तेथून पुढे गेल्यास खडकात कोरलेली प्रशस्थ गुहा आहे
ह्या गडावरून माणिकडोह जलाशयाचा परिसर, चावंड, नाणेघाट, शिवनेरी, भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर दिसतो.
 
हा किल्ला सातवाहन कालीन असून असून नाणे घाटाच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधला आहे. नाणे घाट हा पूर्वीचा व्यापारी मार्ग होता. त्या कारणास्तव ह्या किल्ल्याला खूपच महत्व होते.  तसेच ह्या किल्ल्याचा इतिहासात काही ठिकावी उल्लेख सापडतो  १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता असा उल्लेख ऐतिहासिक कागद्पत्रामध्ये आढळतो. नंतर १८१८ च्या सुमारास इंग्रजांनी जुन्नर मधले अनेक किल्ले वर हल्ले करून ते नेस्तनाबूत केले गेले. हडसरवर सुद्धा इंग्रजांनी हल्ला चढला व त्याच्या अनेक वस्तू नष्ट केल्या गेल्या.

मार्ग - पुणे ते जुन्नर एस टी व खाजगी गाडीने हडसर गावापर्यंत जाऊ शकतो.
          मुंबई ते जुन्नर एस टी ने  येताना आळे फाटा, ओतूर , अहमदनगर ह्या एस टी ने सितेवाडी फाट्यावर             उतरावे व खाजगी वाहनाने हडसर गावापर्यंत येतात येईल.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा