Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

किल्ले विसापूर

                             किल्ले विसापूर


महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये  विसापूर म्हणजेच संबळगड पुण्यापासुन साधारणतः ५० कि. मी. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुलुक्यात असून पवनमावळात डोंगररांगेत वसवलेला हा एक गिरीदुर्ग. लोहगड आणि विसापूर हे दोन्ही गड एकमेकांच्या लागत आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही गडाचा इतिहास अलग करणे अशक्य. ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ३५०० फूट विसापूर किल्ल्याला जाताना मळवली हे रेल्वे स्थानक लागते. तेथून भाजेगावातून ह्या किल्ल्याचे दर्शन होते.  किल्लाकडे भाजे मार्गाने गेल्या बुद्धकालीन लेणी पाहावयास मिळते. भाजे गावातून चालत चालत तासभर लागतो. दुसरा मार्ग तो गायमुख खिंडीतून ह्या मार्गाने जाताना एक पाषाणात कोरलेली पाण्याच्या टाकी पाहावयास मिळते.
विसापूर किल्ला लोहगडावरून उंचावर व विस्ताराने ही मोठा किल्ला आहे ह्या गडाला दोन प्रवेश द्वार असून उत्तरेकडील दिल्ली दरवाजा व दक्षिणेकडील कोकण दरवाजा परंतु आता मात्र ते पडलेल्या स्थितीत पाहावयास मिळतात. परंतु त्यांवरून ह्या किल्ल्याची भव्यतेची कल्पना येते. गडावर अनेक पाण्याचे टाक्या आहेत मारुतीचे देऊळ एक मोठा जात आहे. गडावरुण लोहगड तिकोना,तुंग गड व पावन धरण पाहावयास मिळते. विसापूर हा किल्ला कोणी बांधला याचा नोंद नाही परंतु सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य,निजाम, मुगल, मराठे व पेशवे ह्यांच्या अधिपत्या खाली होता. ह्या गडाच्या भवताली अनेक बुद्धकालीन लेण्या आहेत त्यावरून ह्या किल्लाच्या प्राचीनतेचा अंदाज काढला जातो.

छत्रपती शिवाजीमहाराजनी १६५७ साली जेव्हा कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला तेव्हा हा किल्ला ही स्वराजात सामील झाला पुढे १६६५ पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या हाती गेला व नंतर १६७० साली मराठ्यांनी पुन्हा हा गड स्वरजात आणला. शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर १६८२ मध्ये मराठे आणि मुघल ह्याच्या मध्ये अनेक युद्ध झाले. छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यू नंतर हा किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला परंतु १७१३ रोजी सरखेल कान्होजी आंग्रे यांनी या किल्ला पुन्हा स्वराजात दाखल केला. सण १७२० च्या आसपास पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याशी मसलत करून राजमाची सोडून सर्व किल्ले शाहू महाराजांच्या देण्यात आले. याच काळात बाळाजी विश्वनाथ ह्या किल्ल्याची बांधकाम केल्याचे उल्लेख आढळतो पेशवे ह्या किल्ल्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी करत.   पुढे १८१८ रोजी इंग्रजांनी विसापूर वर हल्ला करून जिंकला व दुसऱ्याच दिवशी लोहगड  किल्ला पेशव्यानी सोडून दिला ह्यावरून या किल्ल्याचे महत्व लोहगडाच्या संरक्षणा च्या  दृष्टीने किती होते याचा अंदाज बांधता येऊ शकतो.  लोहगडला आल्यावर आवर्जून हा गड पाहण्या जोगा आहे


मार्ग - मळवली या रेल्वेस्टेशनने उतरून तेथून भाजेगावातून दोन मार्ग आहे
१) भाज्या लेण्यामार्गे                    २) भाजेगावातून गायमुखी खिंडीतून डावीकडे वळावे
पाटण गावातून विसापूर किल्ल्याला जाण्यासाठी मार्ग आहे  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा