किल्ले घनगड
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले घनगड हा पुणे जिल्ह्यातील एक किल्ला असून हा एक दुर्गागिरी आहे. हा गड समुद्रसपाटीपासून ३००० फीट उंचीवर असून पुण्यापासून ह्याचे अंतर साधारणतः १०० कि.मी. आहे. लोणावळा खंडाळ्यापासून साधारणपणे ३० कि.मी. आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या तैलबैला या डोंगररांगात वसलेला आहे. हा गड दुर्गम भागात मोडत असल्यामुळे त्याचा इतिहास उपलब्ध नाही. ह्या गडाचा इतिहास ३०० वर्षा पासून उपलब्ध आहे. शिवाजी महाराजांनी १६५७ साली जेव्हा घाटातील भाग स्वराजात सामील घेण्यास सुरवात केली तेव्हा हा गड स्वराजात सामील केला गेला असावा. ह्या गडाचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी व कोकण-पुणे व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरत. हा किल्ला १८१८ पर्यंत स्वराजात होता. कोरीगड इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला.
या गडावर येण्यासाठी लोणावळा मार्गाने व त्याच प्रमाणे ताम्हिणी घाट मार्ग येऊ शकता गडाच्या पायथ्याशी एकोले गाव असून ह्या गडावर जाण्यासाठी ह्या गावामार्गे यावे लागते. ह्या गडावर येताना तुम्हाला लोणावळा किंवा पेठे शहापूर या ठिकाणी छोटे हॉटेल्स आहेत. हा ट्रेकिंग साठी उपयुक्त आहे. घनदाट झाडीमधून या गडावर येण्यासाठी वाट आहे. एकोले गावातून अर्धा तासात गडाच्या प्रवेशद्वार पर्यंत पोचता येते. इंग्रजांच्या हल्ल्यात ह्या किल्ल्याची पडझड झाली आहे. गडाच्या पायऱ्या नष्ट केल्या गेल्या परंतु शिवाजी ट्रायल ग्रोउपने हे सेवाभावी संस्थेने गावकर्यांच्या मदतीने हा गडाची दुरुस्ती केली आहे. उदा. ज्या ठिकाणी पायऱ्या उपलब्ध नाही तेथे लोखंडी शिड्या लावल्या गेल्या आहे. गडाच्या प्रवेशद्वार जवळच गिरजाई देवीचे मंदिर आहे. ह्या किल्ल्यात दोन दरवाजे आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी लोखंडी शिडी आहे. गडाच्या दुसऱ्या गेट जवळ पाण्याचे टाक आहे. बालेकिल्ल्याच्या वास्तू ची पडझड मुळे त्याचे केवळ अवशेष उपलब्ध आहे. ह्या गडावर काळ्या पेशंट कोरलेल्या अनेक गुहा आहेत. ह्या गडाच्या बालेकिल्ल्यावरून तेलबेला, कोरीगड, मुळशी धरण व सुधागड सरसगड व कोकणातील अनेक वाट दिसतात.
मार्ग- पुण्याहून पौड - मुळशी -ताम्हिणी मार्गे किंवा लोणावळा मार्गे येता येते.
मुंबईवरून लोणावळा मार्गे एकोले पर्यंत येता येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा