Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

रविवार, २९ मार्च, २०२०

किल्ले जंजिरा

किल्ले जंजिरा



महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात असून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला असणाऱ्या अरबी समुद्रात हा जंजिरा किल्ला असून हा एक जलदुर्ग असून हा किल्ला मुंबई पासून १४० कि.मी. व पुण्यापासून १५० कि.मी. आहे. ह्या किल्ल्याला अलिबाग किंवा रोहा मार्ग जाता येते. मुरुड बीच वरून ४ कि. मी, अंतरावर राजपुरी गाव आहे तेथून किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीची सोय आहे. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतला असून त्याचा अर्थ 'बेट' होतो. जंजिऱ्याचे प्रवेश द्वार ने आत गेल्यास त्याच्या तटबंदीची भक्कम बांधणी आपल्याला अजूनही समजते.


किल्ल्यावर वर एक कलाल बांगडी तोफ ही पंचधातूची आहे. दुसरी आहे गायमुख तोफ . तिसरी चावडी तोफ आहे. ह्या तोफेचा पल्ला ६ ते १० कि.मी. दूर होता. किल्ल्यावर घुमटीचे अनेक वस्तू पाहावयास मिळतात. दर्या दरवाजा /चोर दरवाजा आहे संकट काळी बाहेर पडण्यास करत असतात. तिसरा दरवाजा किल्ल्याच्या मागील बाजूस आहे. किल्ल्याच्या मध्य भागी सुरुल खानाचा  ७ मजली भव्य होता किल्ल्या मध्ये पूर्वी तीन मुहल्ले होते. किल्ल्यावर एक शाही तलाव आहे. तलावाच्या बाजूलाच राणीचे शिश महल होता. किल्ल्याला एकूण १९ बुलंद बुरुज आहे. तलावाच्या बाजूला बालेकिल्ल्या आहे. किल्ल्यावर कित्येक तोफा आहे. किल्ल्यावर एक मंदिर आहे हा किल्ल्या ३३० वर्ष हा किल्ला जुना आहे.



ह्या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. ह्यात कोळी लोक राहत. राम पाटील हा त्यांचा प्रमुख होता. हा ठाणेदाराला जुमेनासा झाला. ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरम खान ची नेमणूक केली. पिरम खान ने दारूच्या व्यापारी असल्याचे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली त्याने दारूचे पिंप बेटावरती भेट दिल्या. पिरम खानने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. व ते पाहण्यासाठी तो भरपूर दारूची पिप घेऊन मेढेकोटावर गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन नशेत असताना त्याने सर्वांची कत्तल केली. व मेढेकोट ताब्यात घेतला. पुढे पिरम खानच्या जागी बुऱ्हाणखानची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. अत्ताच जो जंजिरा आहे तो पिरम बुऱ्हाणखाने बांधलेला आहे. व पुढे इ. स. १६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली.  जंजिरेचे सिद्धी हे मूळचे आफ्रिकेतले. ह्या किल्ल्यावर अनेक राजांनी हल्ले केले पण यशस्वी होऊ शकले नाही. असा हा अजिंक्य किल्ला ३ एप्रिल १९४८ साली स्वतंत्र भारतात सामील झाला.


मार्ग 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा