Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

शनिवार, २८ मार्च, २०२०

किल्ले तिकोना

                            किल्ले तिकोना




महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले तिकोना उर्फ वितंडगड हा पुणे जिह्यातील मावळ तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून साधारणपणे ११०० मी. आहे. पुण्यापासून साधारणपणे ७० कि.मी दूर आहे. ह्या किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे त्याला तिकोना असे नाव पडले असावे. तिकोना गडाच्या पायथ्याशी तिकोना पेठ आहे आणि ह्या पेठेतून गडावर जाण्यासाठी मार्ग आहे. खाजगी वाहन थेट किल्ल्याच्या पायथ्याशी येते या किल्ल्या आकाराने अरुंद असल्यामुळे त्याचा वापर टेहळणी साठी केला जातो. ह्या किल्ल्यावरून पवना धरणाचे जलाशय, तुंगगड, मोरगिरी किल्ला दिसतो. या गडाच्या पायथ्याशी गडद लेणी आहे.


गडावर जाताना जसजस वरती जाऊ तसतसे मार्ग आखूड होते त्यामुळे ह्या गडाची चढाई थरारक बनते. गडाची पहिली देवळी काही पडक्या अवस्थेत आहे. पुढे गेल्यावर वेताळ दरवाजाने आपण प्रवेश करतो त्याच्या बाजूला असलेला पठाराच्या बाजूला एक बुरुज आहे त्याला वेताळ बुरुज म्हणत असतील वेताळ दरवाजा पुढे गेल्यावर गडावर एक चपटदार मारुतीचे मूर्ती दिसते. मारुतीच्या मूर्ती पुढे गेल्यावर अनेक वास्तूचे अवशेष दिसतात व तेथे तुळजाई मंदिर आहे ते एक सातवाहन कालीन लेणं आहे. गड बांधणीसाठी लागणार घाना सुद्धा आहे व त्यापुढे बालेकिल्ल्यात जाण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. बाले किल्लावर पोहचल्यावर बालेकिल्ल्यावर पोहचल्यावर त्रिंबकेश्वर मंदिर आहे.

ह्या  गडाचा इतिहास फार जुना दिसत नाही पहिला निजाम मलिक अहमदच्या ताब्यात हा होता  १६५७ च्या आसपास जेव्हा भिविण्डी व कल्याण परिसर जिंकला तेव्हा हा गड स्वराजात आला. हा किल्ला नेताजी पालकरांच्या ताब्यात दिला परंतु पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला परंतु ५ वर्षातच हा गड पुन्हा स्वराजात आला
मार्ग - त्रिकोणां किल्ला हा रेल्वेस्टेशन कामशेत २६ कि. मी. असून पुण्यापासून कामशेत ५१ कि. मी. आहे. तेथून पेठे पर्यंत खाजगी वाहनांने सरळ ह्या त्रिकोना पेठेत जात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा