Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

रविवार, २९ मार्च, २०२०

किल्ले पुरंदर

                              किल्ले पुरंदर


महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले पुरंदर पुणे जिल्यातील पुरंदर तालुक्यात असून त्याची समुद्रसपाटी पासून ४४४२ फीट असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. हा एक गिरिदुर्ग असून छत्रपती संभाजी राजे यांचे जन्म स्थान आहे. पुरंदर किल्ल्याचें नाव पुरंदर नावाच्या गावावरून पडले जे किल्ल्याच्या सर्वात जवळचे आहे. पुरंदर च्या लागूनच वज्रगड नावाचा किल्ला आहे. हा किल्ला आता मिलिटरी च्या ताब्यात असून येथे मिलिटरी चे ट्रेनिंग सेंटर असून वज्रगड सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे तर पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी स्वतःचा आई डी प्रूफ असल्याशिवाय आत जात येत नाही. गडावर चढण्यासाठी पायऱ्या असल्याने हा चढण्यास सोपा आहे. गडावर जाण्याचा टाईमिंग आहे सकाळी ९ ते ५. गडावर पहिल्यांदा लागते ते प्रवेशद्वार सर दरवाजा व नंतर लागतो तो केदार दरवाजा आहे. ह्या दरवाजाकडून पुढे गेल्यास बाल्लेकिल्ला आहे. किल्ल्यावर बोर पाण्याचे टाक आहे. विहिरी आहेव बालेकिल्ल्यात केदारेश्वराचे मंदिर आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. पुरंदरेश्वर मंदिर आहे.रामेश्वराचे मंदिर, खंदकडा पद्मवति तळे, शेंदऱ्या बुरुज, पुरंदर माची, भैरवगड, वीर मुरारबाजी यांचा पुतळा आहे.  ह्या गडाच्या नावाची एक आख्खायीकां आहे पुरंदर म्हणजे इंद्रपर्वत हनुमान जेव्हा दोनाद्री पर्वत उचलून नेला तेव्हा त्याचे काही तुकडे पडले तोच हा पर्वत होय

पुरंदर किल्ल्याचा इतिहास हा ११ व्या शतकातील यादवांच्या काळातील असून पुढे हा किल्ला पर्शियन आक्रमण कर्त्यांनी त्याच्या ताब्यात घेतला. पुढे या पर्शियन आक्रमणकर्त्याने १३५० रोजी पुरंदराच्या तटबंदीचे बांधकाम केले. नंतर तो बिजापूर अहमदनगर राज्यवटीत राहिला  इ.स. १५९६ रोजी अहमदनगरचा सुलतान बहादुरशहा मालोजी भोसले यांना 'पुणे' आणि 'सूप' ची जहागिरी दिली. (मालोजी भोसले हे शिवाजी महाराजांचे आजोबा ) इ.स. १६४६ रोजी शिवाजीमहाराजांनी पुरंदरवर हल्ला करून मराठा साम्राजात पुरंदर किल्ला समाविष्ट करून घेतला. इ. स. १६६५ औरंगज़ेबच्या सरदार मिर्जाराजे जयसिंग व दिलेरखान ने पुरंदरला वेढा मारला तेव्हा पुरंदर किल्लेचा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे हे शत्रूशी लढा देत धारातीर्थी पडले. शेवटी शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. त्या महाराजांनी २३ किल्ले व ४ लाख होन दिले. परंतु पाच वर्षातच महाराजांनी पुन्हा पुरंदरसह सर्व किल्ले जिंकले. १४ मे १६५७ रोजी संभाजीराजांचा जन्म पुरंदरावर झाला. ह्या किल्ल्यावर त्यांनी नखशिखांत, नायिकाभेद, सातशतक व बुधभूषण हे ग्रंथ लिहले.
                              
मार्ग -
  1. पुण्याहून: पुण्याहून ३० कि. मी. अन्तरावर असणार्‍या सासवड या गावी यावे लागते.
  2. सासवडहून: सासवडहून सासवड - भोर किंवा सासवड नारायणपूर ही गाडी घेऊन नारायणपूर गावाच्या पुढे असणार्‍या 'पुरन्दर घाटमाथा' या थाम्ब्यावर उतरतात. हा घाटमाथा म्हणजे पुरन्दर किल्ला आणि समोर असणारा सूर्यपर्वत यामधील खिण्ड होय. या थाम्ब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते. ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरन्दर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो.
नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडीरस्ता थेट किल्ल्यापर्यन्त गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडीरस्ता. या रस्त्याने चालतचालत गड गाठण्यास २ तास पुरतात. तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एका तासात माणूस पुरन्दर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहोचतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा