Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

शनिवार, २८ मार्च, २०२०

किल्ले कोरीगड

                            किल्ले कोरीगड 

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले कोरीगड हे पुणे जिल्यातील मावळ तालुक्यात असून  गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटी पासून १०१० मी. उंचीवर आहे. पुण्यापासून साधारणतः ७७ ते ११० कि. मी. अंतरावर असून किल्ले कोरीगडला जाण्यासाठी तीन चार मार्ग आहेत त्या निवडलेल्या मार्गा नुसार अंतर कमी जास्त होत असते. त्या पैकी लोणावळा वरून २६ कि. मी. अंतरावर असलेले पेठे शहापूरला किंवा आंबवणे गाव हे किल्ले कोरीगडच्या पायथ्याशी आहे. येथे उतरून गडावर जाता येते. गडाला जाण्यासाठी लोणावळा वरून आंबी व्हॅली बसने पेठे शहापूर उतरता येते.
 पेठे शहापूर मार्गे गडावर जाण्याच्या मार्ग आंबवणे गावातून जाण्याऱ्या मार्गापेक्षा सोपा आहे. गडावर जाताना आंबी व्हॅली चा परिसर दिसतो. गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. जाताना प्रथम एक गणेश मंदिर दिसते व काळ्या पाषाणात कोरलेली गुहा असून त्यात एक पाण्याचे टाक आहे. पुढे गेल्यावर गडाचे प्रवेशाद्वार गणेश दरवाजा लागतो तो नवीन दरवाजा बसवण्यात आलेला दिसतो. गडाच्या तटबंदीची काही ठिकाणी पुनर्बांधणी केलेली दिसते. गडावर कोराई मातेचे मंदिर आहे ह्या वरूनच ह्या गडाचे नवे कोरीगड पडले असावे. गडावर अनेक पाण्याचे टाक्या आहे. गडावर एकूण ६ तोफा असून 'लक्ष्मी' तोफ सर्वात मोठी तोफ दिसते



गडावरून टायगर पॉईंट, राजमाची, तुंग किल्ला, पवना धरणाचे जलाशय आंबी व्हॅली परिसर दिसतो. हा गडाचा इतिहास जास्त उपलब्ध नसून पहिला निजाम मलिक अहमद याने हा किल्ला कोळी राजाकडून जिंकला. पुढे शिवाजी महाराजांनी १६५७ रोजी भिविण्डी व कल्याण परिसर जिंकल्या नंतर हा किल्ला सुद्धा स्वराजात सामील केला. व नंतर १८१८ रोजी  हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
मार्ग - पुणे ते लोणावळा रेल्वेने किंवा एस. टी  व लोणावळा ते पेठे शहापूर पर्यंत एस टी किंवा खाजगी बसने
         पुणे ते पौड व तेथून आंबी व्हॅली मार्ग आंबवणे किंवा पेठे शहापूर ला खाजगी मार्गाने 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा