Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

बुधवार, १ एप्रिल, २०२०

किल्ले दातेगड ( सुंदरगड )

                     किल्ले दातेगड ( सुंदरगड ) 



महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये दातेगड हा सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील किल्ला ऑन हा एक गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटी पासून साधारणपणे १०२७ फूट उंचीवर आहे. हा किल्ला बामणोली डोंगररांगेत आहे. या गडाची तटबंदी नैसर्गिक काळ्या कातळाची असून गडावर जेवढ्या वास्तू आहेत त्या पाषाणात कोरलेल्या आहे. दातेगड हा सातारा शहरापासून साधारणपणे ७५ कि..मी आहे. तर पाटण पासून १५ कि.मी. आहे. पुण्यापासून साधारणपणे १९० कि.मी. आहे. तर मुबईपासून ३३० कि . मी.
गड्याच्या पायथ्याशी टोळेवाडी असून टोळेवाडी पार   केल्यानतंर पायर्यांच्या वाटेने गडावर पोहचता येते. हा गड ५ एकर मध्ये विस्तारलेला आहे. गडाचे प्रवेशद्वार भग्न अवस्थेत आहे. असे म्हणतात हा दरवाजा १९६७ च्या कोयना भूकंपात कोसळला आहे. या पश्चिम तटावरील भग्न दरवाजा शेजारी ६ फूट उंच असेल गणपंतीची मूर्ती आहे. तेथून थोडे पुढे गेल्यास खडकात खोदलेली विहीर आहे. व त्याच विहिरीमध्ये तळाशी महादेवाचे खडकात कोरलेले मंदिर आहे. या मंदिरात शिवलींग या नक्षीदार नंदी हाये. गडाच्या एका बाजूची तटबंदी अजून चांगल्या अस्वस्थेत आहे. पहारेकरांसाठी देवड्या, धान्य कोठार, वाड्याचे अवशेष पाहावयास मिळतात.
                                              
दातेगडाचा फारसा इतिहास उपलब्ध नसून ह्याच्या कोरीव कामानुसार तो प्राचीन असावा. मध्य युगामध्ये चिपळूण, पाटण, विजापूर,विजयनगर हा मार्गावर बांधलेल्या गडांपैकी एक .  शिवाजी महाराजांच्या काळात दातेगडास सुंदरगड असे नाव होते. त्यात शिवाजी महाराज स्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती या शिवबंदी करिता गडाशेजारी गावातील जागा नेमून देण्यात आल्या होत्या पाटणकर हे देशमुख म्हणून स्वराजाचे काम पाहत. व या किल्ल्याचे अधिपत्य सुद्धा त्यांच्याकडे होते. शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला महालांच्या अधिपत्या खाली गेला व १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात न लढताच गेला

मार्ग - सातारा - पाटण - टोळेवाडी
          पुणे - सातारा - पाटण - टोळेवाडी
          मुंबई - सातारा -पाटण - टोळेवाडी    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा