वसोटा किल्ला (व्याघ्रगड )

ह्या गडावर जाण्यासाठी सातारा ते कास पठार व कास पठार ते बामणोली गाव असा आहे. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाजवळ वसलेले आहे. ह्या गावाजवळ बोटी उपलब्ध आहेत. वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी ग्रुप बरोबरच जावे लागते. वासोटावर जाण्यासाठी बोटीचे बुकिंग व वनविभागाची परवानगी लागते. शिवसागर जलाशयातून साधारणपणे १ तास बोटीचा प्रवास करावा लागतो. बोटीने जाताना कोयना नदी, कांदेर नदी व सोशी नदी ह्या नद्यांचा संगम पाहावयास मिळतो. पुढे आपण वासोट्याच्या पायथ्याशी असणारे मेट इंदवली गावाजवळ पोहचतो या पुढे ४ कि. मी. जंगलातून प्रवास असतो. जंगलात प्रवेश करण्याआधी तुमच्याकडे असणाऱ्या प्रत्येक वस्तूची मोजणी केली असते. विशेष करून प्लास्टिक कारण आपल्याकडून कोणतेही प्लास्टिक किंवा इतर वस्तू येथे राहिल्यास त्याचा दुष्परिणाम जंगलातील प्राण्यावर होऊ शकतो. ह्या जंगलात अनके रानटी प्राणी आहेत. वाघ, बिबट्या अस्वल या सारखे अनेक प्राणी आहेत. जंगलातून जाताना अनेक पाण्याचे झरे लागतात. किल्ल्यावर जाताना बिस्कीट घ्यावे.
किल्ल्यावर गेल्यावर किल्ल्याचा प्रवेशद्वार पडक्या अवस्थेत आहे व पुढेच हनुमानाची मूर्ती आहे. किल्ल्यावर अनेक वाड्याचे अवशेष आहेत चुन्याचा घाना, पाण्याच्या टाक्या दिसतात. ह्या किल्ल्याच्या बाबू कड्यावरून जुना वासोटा किल्ला दिसतो त्या किल्ल्या कडे जाण्यासाठी जॉन्टी वाट नसल्या कारणाने व जंगली प्राणी असल्यामुळे त्या गडावर कोणीही जात नाही. महादेवाचे मंदिराची डागडुगी केलेली दिसते. किल्ल्यावर एक माची आहे त्याला कालकाईचे ठाण म्हणतात. गडावरून नागेश्वरची गुहा दिसते. किल्ल्यापासून बोटीपर्यंत सूर्यास्तापर्यंत जावे कारण जलाशयातून सूर्यास्त पाहणे एक अविस्मरणीय क्षण असतो.
हा किल्ला शिलाहार कालीन असून ह्या गडाची बांधणी शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली. शिवाजी महाराजांनीं जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले जिंकले पण वासोटा दूर असल्याकारणाने हा किल्ला घेतला नाही पुढे शिवाजी महाराज पन्हाळ किल्ल्यावर अडकले असताना आपल्या मुख्यत्यारित मावळातील पायदळ पाठवून त्यांनी अवोस किल्ला ६ जून १६६० साली जिंकला व गडाला व्याघ्रगड असे नाव ठेवले. ह्या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात. याचे कारण निर्जन व घनदाट असे अरण्य व ह्या जंगलात वाघ व बिबट्या या सारखे अनेक प्राणी होते. आणि अजूनही आहेत

मार्ग - वासोट्याला जाण्यासाठी प्रमुख दोन मार्ग आहेत
१) कोकण - चिपळूण कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर एस. टी बसच्या गाड्या आहेत चोरवणे पासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते.
२) सातारा-कास पठार - बामणेली हा मार्ग जास्त सोयीचा आहे हा गाडीमार्ग असून यावर एस. टी बसेस आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा