Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

किल्ले चंदनगड

                              किल्ले चंदनगड



महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती किल्ले चंदनगड हा किल्ला सातारा जिल्यातील कोरेगाव तालुक्यात आहे. हा एक गिरिदुर्ग असूनसमुद्रसपाटी पासून ३८०० फूट उंचावर आहे.  साताऱ्या पासून साधारणपणे २५ कि.मी. अंतरावर तर पुण्यापासून साधारणपणे  ९० व मुंबईपासूनच्या २४० कि.मी अंतरावर हा किल्ला आहे. चंदन वंदन हि एक दुर्गजोडी असून हे किल्ले सह्याद्रीच्या महादेव ह्या उपरांगेवर स्थित आहे.
पुणे सातारा रोडवर भुईंज गाव पासून डावीकडे वळाल्यावर गडावर जाण्याचा मार्ग आहे . गडावर जाण्यासाठी दोन गर्ग आहे. एक इब्राहीमपूर गावाजवळून तर दुसरा बेलमाचीवरून. इब्राहीमपूर गावजळून दुधाणेवाडी वाहनाने जावे व पुढे १ कि.मी. ची चढाई केल्यास गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचता येते. हा सर्वात सोपा मार्ग आहे.
गडाचे प्रवेश द्वार हे पडक्या अवस्थेत असून गडावर महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर शिवाजीमहाराजांनी बांधले आहे गडावर राजा बांधलेली दोन दगडी मिनार आहे. चांगडासाब्या पायथ्याशी मध्यभागी एक दगडी चौथरा आहे. दारुगोळा कोठार असून ह्या कोठाराच्या भिंडीतला छप्पर नाही. गडावर के विहीर आहे.
पुरातन तांब्रालेखानुसार हा किल्ला ११व्य शतकातील असून ह्या किल्ल्याची बांधणी शिलाहार वंशातील राजाभोजणे केली आहे. शिवाजी महारांजानी अफजलखानाच्या वधानंतर सातारा किल्ल्या जिंकल्यावर ह्या गडावर आक्रमण करून हे गड स्वराजात सामील करून घेतले व ह्या गडाचे णव शूरगाड नाव बदलून चंदनगड ठेवले. उचे संभाजी महारांच्या कारकिर्दीत १६८५ मध्ये अमातुल्य खानने ह्या गडावर हल्ला केला. पुढे १६८९ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता पुढे तो मोगलांकडे गेला. पुढे १७०७ मध्ये हा किल्ला शाहू महाराजांनी पुन्हा स्वराज्यांत आणला पुढे हा किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.








मार्ग - सातारा   - भुईंज -इबरहीमपूर-दुधांवाडी
           पुणे - सातारा   - भुईंज -इबरहीमपूर-दुधांवाडी
          मुंबई -सातारा   - भुईंज -इबरहीमपूर-दुधांवाडी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा