Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

गड शिवनेरी

                                 गड शिवनेरी 
                                     
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये शिवनेरी किल्याचे नाव आपण सर्वाना ज्ञात असलेले नाव आहे. आपण सर्व जण ह्यास एक तीर्थस्थानासारखे शिवाजी महाराजांचा जन्म ह्याच किल्ल्यावर झाला . पवित्र असा हा किल्ला आहॆ. त्यामुळे ह्या गडाला अन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे . हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. पुण्याहून साधारणतः १०५ कि. मी. अंतरावर आहे. शिवनेरी साधारणतः ३५०० मी. उंचीवर आहे. शिवनेरी हा एक गिरीदुर्ग प्रकारचा किल्ला असून किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडीने आपण जाऊ शकतो. किल्लाच्या चढण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे. किल्ल्याच्या सुरवातीस महादरवाजा आहे. त्यानंतर दुसरा दरवाजा लागतो तो म्हणजे गणेश दरवाजा पुढे तिसरा दरवाजा लागतो तो म्हणजे पिराचा दरवाजा गडाचा भाग हा वनखात्याच्या त्याब्यात असून त्यांनी काही उद्याने तयार केली आहेत त्यातलेच एक तानाजी मालसुरे उद्यान. शिवनेरीवर  कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात.  वरच्या बाजूला हत्ती दरवाजा आहे व पुढे गेल्यावर एक पाण्याचे ताक आहे. पुढे मीना दरवाजा आहे व त्या पुढे कुलूप दरवाजा आहे. पुढे अंबरखाना आहे. ह्याचा उपयोग धान्य साठवण्यासाठी केला जात होता. ह्या पुढे शिवकुंज आहे. ह्या पुढे पाण्याची अजून एक  टाकी आहे. थोडे पुढे आल्यावर एक मशीद आहे. सैन्यातील मुस्लिम सैनिकांना नमाज पढण्यासाठी बांधण्यात आली असावी. इथून पुढे गेल्यावर आपल्याला हमामखाना पाहावयास मिळतो व त्यापुढे गेल्यावर शिवजन्म स्थानाची इमारत दिसते. हि दुमजली इमारत असून खालच्या मजल्यावर सन १९ फेब्रु. १६३० रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिव जन्म स्थानापुढे आल्यावर बदाम टाके आहे हे नाव ह्याच्या आकारामुळे मिळाले असेल. ह्या टाक्याच्या पुढे आल्यावर आपल्याला कडेलोट कडा पाहावयास मिळतो. हा कडा साधारणतः १५०० मी. उंच आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी ह्या कड्याचा उपयोग केला जात असत. पुढे आल्यावर शिवाई मंदिर पाहावयास मिळते. ह्या गडाच्या सभवताली अनेक प्राचीन लेण्या आहेत
शिवाजी महाराजांची जन्माचा इतिहास असा आहे की उत्तेरेकडून मुघल बादशहा शाहजहान याने दख्खन सर कारण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या ते बेचिराख करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर ! शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले.
अश्यात जिजाबाई गरोदर होत्या, तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला. त्याच्या चारी बाजुंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईच्या रक्षणाची जवाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले. फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १९३० रोजी जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. अश्या या पवित्र किल्ल्याला एकदा तरी भेट द्यावी.



कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ - पुणे पुणे रेल्वे स्थानकापासून ३-४ किमी. अंतरावर

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक - पुणे रेल्वे स्टेशन

रस्त्याने

पुणे रेल्वे स्थानकापासून अंदाजे १०५ किमी. अंतरावर

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१९

किल्ले सिंहगड

                           किल्ले सिंहगड 
                                
 महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये 'सिंहगड ' हा किल्ल्याचे स्वराजात विशेष स्थान आहॆ. हा किल्ला सह्याद्रीच्या भूलेश्वर रांगेत असून जमिनीपासून ७४० मी. तर समुद्रापासून १३१२ मी उंचीवर आहॆ. पुण्याहून साधारणपणे ३० कि. मी. अंतरावर खडकवासलाच्या बॅकवॉटरला लागून असलेल्या सह्याद्रीच्या रांगेत आहॆ. हा गड भौगोलिकरीत्या पाहिल्यास गडाच्या चारी बाजूस तीव्र उताऱ्याचा दरी आहे. त्यामुळे गडावर चढाई करणे शत्रूला अवघड जाते. गडाचा चारही बाजू वनविभागाच्या ताब्यात असल्या कारणामुळे दुचाकीस ३० रु. तर चारचाकीस ५० रु. आकारले जातात. पावसाळ्यात गडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटीस येतात. गडाच्या दरवाज्याच्या पर्यंत चारचाकी व दुचाकी जाऊ शकते. वाहनतळाची सुविधा तसेच छोटी छोटी दुकाने आहेत. तुम्हाला तेथे वडापाव, ताक, लस्सी , करवंद, चिंच अश्या सारखे त्या त्या काळातले रानमेवा खाण्यास मिळू शकते
किल्यावर पुणे दरवाजा १,२,३  अनेक छोट्या छोट्या गुहा, खंदकाडावरी बुरुज, दिंडी दरवाजा, तोफखाना, घोड्याची पांगा, लोकमान्य टिळकांचा बंगला १८८९ रोजी लोकमान्य टिळक सिंहगडावर राहण्यास आले. गीतारहस्य व आर्टिक होमली वेदास हे पुस्तक लिहले तसेच टिळक व महात्मा गांधींची भेट सिंहगडावर झाली. गडावर 'देवटाकी' आहार अजूनही त्याचे पाणी पिण्यासाठी वापरतात. गडावर राजाराम महाराजांची समाधी असून त्याचा २ मार्च १७०० साली झाले. कलावती बुरुज, हनुमान मंदिर, तानाजी कडा, झुंझार बुरुज, उदयभानाचे मृत्यू स्थळ, तानाजी मालसुरे याचे स्मारक आहे. कोंढाणेश्वर मंदिर यादवचे कुलदैवत. 
सिंहगडाचे पूर्वीचे नाव 'कोंढवा'. तो पूर्वी मुघलांच्या ताब्यात होता. उदयभान हा एक शूर राजपूत होता. 
व तो ह्या कोंढाणाचा किल्लेदार होता. किल्याच्या दोन्ही गडाच्या दारावर सैनिकांची कुमक मोठ्या प्रमाणात असे व गडाच्या चारी बाजूस खोल दरी असल्यामुळे  असा किल्ला स्वराजात असावा असे माँ जिजाऊची इच्छा शिवाजी महाराजांनी पूर्ण करायची ठरवले असता तानाजी मालसुरे जे महाराजांनी शूर सरदार यांनी स्वतः च्या मुलाचा विवाह सोडून कोंढाणा गड सर करण्याच्या मोहीम स्वतः  हाती घेतली व "आधी लग्न कोंढाणाचे व मग रायबाचे " हे विधान आज ही प्रसिध्द आहे. 
तानाजी मालसुरे शिवाजी महाराजांचा शूर सरदार होता. ते मूळचे महाड येथील उमराठे गावचे तानाजींना माहिती होते कि कोंढणगडावर उदयभान नावाचा किल्लेदार आहे व किल्लेला चोहीबाजूने तीव्र उतार व गडावर कडक पहारा  फक्त गडावरील पश्चिमेकडील कडा सर्वात कठीण असलेले भाग त्यामुळे त्या कडावर सैनिकांची कमी असल्यामुळे तानाजी मालसुरे यांनी ह्या कडावरून गडावर चढाई करण्यासाठी काही सैनिक घेऊन जाण्याचे ठरवले व त्याचा भाऊ सूर्याजी मालसुरे ह्याच्या बरोबर उर्वरित सैनिक गडाच्या दरवाज्यावरून गडावर हल्ला करण्याचे ठरवले. कठीण कडा चढवण्यासाठी त्यांनी घोरपडीचा उपयोग केला. गडावर दाखल होताच तानाजी मालसुरे व मावळ्यांनी शत्रू वर जोरदार हल्ला चढवला उदयभान यास जेव्हा चढाई ची माहिती कळाली आणि त्यांनी जोरदार हल्ला चढवला  तानाजी मालसुरे आणि उदयभान यांच्यात जोरदार लढाई झाले. दोघेही शूर पराक्रमी होते. लढता लढता तानाजी मालसुरे ह्याची ढाल तुटली व तरी त्यांनी हाताला फेटा बांधून उदयभान शी युद्ध केले व दोघे धारातीर्थी पडले. मावळ्यांना जेव्हा आपला सरदार धारातीर्थी पडल्याचे समजले तेःव्हा ते रणांगण सोडून पळू लागले तेव्हा तानाजी मालसुरे यांचे भाऊ सूर्याजी मालसुरे यांनी गडाचे सर्व दरवाजे व कड्यावरचे दोर कापली व म्हणाले " तुमचा बाप येथे मरून पडला आहे कोठे पळता रण सोडून मी गडाचे सर्व दरवाजे बंद केले आणि कड्यावरचे दोर कापले एक तर लढता लढता मरण प्रकारा नाहीतर गडावरून उडया मारून जीव द्या " व गड जिंकला जेव्हा शिवाजी राजेंना तानाजी मालसुरे यांच्या परक्रमाची माहिती समजले तेव्हा त्यांच्या मुखातून "गड आला पण सिंह गेला " त्यामुळे ह्या गडाचे नाव सिंहगड ठेवण्यात आले 
आजही हा गड तानाजी मालसुरे यांचा इतिहास सांगत उभा आहे 

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ - पुणे

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक - पुणे

रस्त्याने

पुणे शहरापासून ३५-४० किमी. अंतरावर आहे. बसेस उपलब्ध आहेत.



सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

किल्ले प्रतापगड

                                                       किल्ले प्रतापगड     
                                    
पौराणिक व एतिहासिक संदर्भ लाभलेल महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील पर्यटकांच आवडत पर्यटन स्थळ आहे. ''महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात'' शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे ''प्रतापगड''. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. महाबळेश्वरच्या सानिध्यात असलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. प्रतापगडाच्या अर्ध्या उंचीपर्यंत जाणारा गाडीमार्ग, किल्ल्यावर फिरण्यासाठी बनवलेल्या सिमेंट रूंद पायवाटा , रस्ते व किल्ल्यावर उपलब्ध असलेली खान पान सेवा यामुळे किल्ल्यावर पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.
प्रतापगडाच्या दक्षिणेस असलेल्या टेहाळणी बुरुजाखाली वाहनतळ आहे. येथून गडावर जाताना उजव्या बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत जागोजागी "जंग्यांची" रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंदूकी किंवा धनुष्य बाण ठेऊन शत्रूवर मारा केला जात असे. जंग्यांची रचना अशी असते की, गडावरून सुरक्षित राहून शत्रूवर सहज मारा करता येतो, पण शत्रूला खालून मारा करता येत नाही. जंग्यांच्या अशा रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. प्रतापगडाच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस गुहा आहे.
प्रतापगडाचा पश्चिमाभिमूख दरवाजा तटबंदीत लपवलेला आहे. या महाद्वाराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तोफांचा मारा थेट दरवाजावर करता येऊ नये. जमिनीपासून उंचावर असल्यामुळे हत्ती किंवा ओंडक्यांनी धडका देवून दरवाजा तोडता येत नसे. महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांतसाठी देवड्या (विश्रांतीकक्ष) आहेत. यातील उजव्या बाजूच्या देवडीत एक प्रचंड तोफ ठेवलेली आहे. महाद्वारातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला लांबवर पसरलेली माची आहे. माची वरून वाट टेहाळणी बूरुजावर (जीवा महाला बुरुज) जाते. या बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. या बुरुजा खालीच वहानतळ आहे. बुरुजावरून प्रतापगडाचा बालेकिल्ला, जावळीचे खोरे व उजव्या बाजूला एका उंचवट्यावर असलेली अफजलखानाची कबर दृष्टीपथात येते.
शिवाजीराजांनी १६५५ रोजी विजापूरचा अदिलशाहचा सुभेदार चंद्रराव मोरे ह्याचा ताब्यात जावळीचा परिसर होता. हा भाग भौगोलिक दुष्ट्या पहिला तर  तेथे घनदाट झाडे असणारे जंगल होते कि सूर्यकिरण हि जमिनी पर्यंत पोचत नसत. शिवाजी राजे  यांनी मोरेना स्वराजचे काम करण्याची प्रवूत्त करण्याचा प्रयत्न  केला परंतु  त्या प्रयत्नाला यश आले नाही. त्यानंतर राज्यांनी मोऱ्यांना हल्ला करून सर्व परिसर ताब्यात घेतला. ह्या घटनेने विजापूरची आदिलशाही हादरली व त्यांनी विजापूर येथे दरबार भरवून शिवाजीराजांना जिवंत किंवा मृत पकडून आणायचा विडा अफजलखानाने घेतला व सुमारे ४०००० फौज घेऊन शिवाजी राजाना पकडण्यासाठी निघाला तो विजापूर ,तुळजापूर, पंढरपूर मार्गे लूटमार करत वाई पर्यंत पोचला. तो १२ वर्ष वाईचा सुभेदार होता परंतु तो कधी जावळीच्या खोऱ्यात उतरला नाही त्यामुळे त्याला ह्या परिसराची माहिती नसल्याचा फायदा राजांनी घेतला अफजल खानचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ह्या वकिलाला प्रतापगडावर पाठवले. त्याच्याशी बातचीत करून अफजलखानाच्या भेटीचे नियोजन प्रतापगडाच्या पायथ्याशी केले. जावळी खोऱ्यातील  घनदाट जंगल व अवघड दऱ्या खोऱ्यातील मार्ग मुले अफजलखानाला फक्त १२००० सैन्य घेऊन येणे शक्य झाले भेटीसाठी तयार केलेला शामयाना सोन्याचांदी आणि हियामोत्यांनी सजवण्यात आला त्यामुळे अफजलखानाला असे भासवण्यात आले कि शिवाजी राजे हे शरण येत आहे शिवाजी महाराज त्याच्या अंगरक्षक जिवा महाले तर अफजलखान हा त्याच्या अंगरक्षक सय्यद बंडा घेऊन भेटीसाठी आले  अफजलखान काही धूर्त खेळी करेल ह्याची कल्पना महाराजां होती व अफजलखाने त्याच्या नेहमीच्या धृत वृत्ती प्रमाणे महाराजांना आलिंगन देताना काटारीने पाठीवर हल्ला केला परंतु महाराजांनी स्वरक्षणा साठी घातलेले चिलखती मुळे बचावले गेले क्षणार्धाचा विचार न करता महाराजनी हातात घातलेले वाघ नख्याने अफजलखानाच्या पोट फाडले अफजल खानाच्या किंकाळी मुळे  सय्यद बंडा महाराजांवर चालून आला परंतु त्याला जिवा महालाने जागीच ठार केले  असा महाराजांनी अफजलखानचा खात्मा केला. महाराजांनी त्या दोघांची कंबर बांधली महाराजांच्या ह्या प्रतापामुळे ह्या गडाला प्रताप गाद असे नाव देण्यात आले 
ह्या गडाचे प्रवेशद्वार, तटबंदी, टेहळणी बुरुज, केदारेश्वर बुरुज, भवानी बुरुज, नगारखाना, पालखींगेट, छोटा दरबार, कडेलोट बुरुज, शिवाजीराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. 
  

गडावर कसे जाल



रस्त्याने

    1. मुंबई - पुणे - महाबळेश्वर हे अंतर २२० किमी आहे. मुंबई - पुणे येथून एसटीच्या बसेस व खाजगी बसेस आहेत. या प्रवासाला ६ ते ७ तास लागतात. महाबळेश्वरहून खाजगी वहानाने किंवा बसने ४० मिनिटात प्रतापगडाच्या पायथ्याशी जाता येते.
    2. मुंबई - गोवा महामार्गावरील पोलादपूरहून आंबेनळी घाटाने थेट प्रतापगडावर जाता येते. या मार्गाने मुंबई ते प्रतापगड अंतर २५१ किमी आहे. या प्रवासाला ६ ते ७ तास लागतात.
  • रेल्वेने

    सातारा हे महाबळेश्वरला जवळचे रेल्वेस्टेशन आहे. सातारा -वाई - महाबळेश्वर अंतर ६८ किमी आहे. या प्रवासाला २ तास लागतात.
  • विमानाने

    पुणे हे जवळचे विमानतळ महाबळेश्वरहून ११७ किमी अंतरावर आहे. या प्रवासाला ३ तास लागतात.

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

किल्ले रायगड

किल्ले रायगड  :

रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते.
रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे असून त्याचे नाव “गंगासागर तलाव” असे आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग “महा-दरवाजा” मधून जातो. किल्ल्यामध्ये असलेल्या राज्याच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. सिहासनाजवळील भाग ध्वनीलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे कि दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरीत्या ऐकू येऊ शकतात. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज असून त्याला “हिरकणी बुरूज” असे म्हणतात.
'किल्ले रायगड ' ह्याचे प्राचीन नाव 'रायरी' निझामशाहीत ह्याचा उपयोग कैदेत ठेवण्यासाठी केला जात असे. शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस वेढा घातला व मे महिन्यात रायरीस स्वराजात शामिल केले. नंतर कल्याणचा सुभेदार हा खजिना घेउन विजापूरला घेऊन जात असल्याची माहिती शिवाजी राजांना समजली आणि त्यांनी तो लुटून सर्व खजिना रायगडावर आणला व त्याचा उपयोग त्यांनी गडाच्या बांधणी साठी केला. रायगड भोगोलिक दुष्ट्या  चढाई करण्यास कठीण व तसेच सागरी व्यापारावर हि लक्ष ठेवता येईल या साठी त्यांनी रायगडाला राजधानी केले . गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणी बुरुज आहॆ  उत्तरेकडे टकमक टोक आहॆ गडाच्या गंगासागर तलावासमोर दोन उंच मनोरे आहेत ते स्तंभ सुमारे पाच माज़ीले होते असे  सांगण्यात येते गडावरील राजभवनाचा चौथरा  सुमारे ८६ फूट लांबीला तर ३३ फूट रुंद  आहॆ  त्या काळी गुप्ता बोलणी साठी वापरण्यात येणाऱ्या खोली म्हणजेच खलबत खानाचे अवशेष आहॆ. महाराजांचा राजभिषेक जेथे झाला ते राज्यमंडप २२० फूट व लांब १२४ रुंद आहॆ गडावर त्याकाळी बाजारपेठ चे अवशेष पाहावयास मिळतात  हा किल्ला अजून इतिहासाची साक्ष अजून ही देत उभा आहॆ
  

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र ही आहेत.

रेल्वेने

सर्व पर्यटन स्थळासाठी मुंबई (सीएसटी), एलटीटी, कुर्ला टर्मिनस, पुणे रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्टेशन (रायगड जिल्ह्यात) भारतीय रेल्वेच्या मुख्य मार्गांसाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वेचे जवळचे रेल्वे स्थानक पेन्, रोहा, वीर इत्यादी आहेत. पनवेल जंक्शन जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. ते मुंबईला (हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वेचे मुख्य मार्ग), ठाणे (ट्रान्स हार्बर लाइन), रोहा, वसई (पश्चिम रेल्वे) याद्वारे जोडलेले आहे. नेरळहून माथेरान पर्यंत एक “नेरो गेज” रेल्वे मार्ग आहे, याला माथेरान हिल रेल्वे असे म्हणतात.

रस्त्याने

रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) बसांद्वारे रस्त्यांनी जोडलेली आहेत. रायगड जिल्हा सायन-पनवेल एक्सप्रेसवेने मुंबईशी जोडला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग हे पनवेल, खालापूर आणि खोपोलीमार्गे जातात. राष्ट्रीय महामार्ग १७, जो पनवेल येथे सुरु होतो , तो पोलादपूरमार्गे पूर्ण जिल्ह्तातून जातो.