Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

किल्ले प्रतापगड

                                                       किल्ले प्रतापगड     
                                    
पौराणिक व एतिहासिक संदर्भ लाभलेल महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील पर्यटकांच आवडत पर्यटन स्थळ आहे. ''महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात'' शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे ''प्रतापगड''. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. महाबळेश्वरच्या सानिध्यात असलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. प्रतापगडाच्या अर्ध्या उंचीपर्यंत जाणारा गाडीमार्ग, किल्ल्यावर फिरण्यासाठी बनवलेल्या सिमेंट रूंद पायवाटा , रस्ते व किल्ल्यावर उपलब्ध असलेली खान पान सेवा यामुळे किल्ल्यावर पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.
प्रतापगडाच्या दक्षिणेस असलेल्या टेहाळणी बुरुजाखाली वाहनतळ आहे. येथून गडावर जाताना उजव्या बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत जागोजागी "जंग्यांची" रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंदूकी किंवा धनुष्य बाण ठेऊन शत्रूवर मारा केला जात असे. जंग्यांची रचना अशी असते की, गडावरून सुरक्षित राहून शत्रूवर सहज मारा करता येतो, पण शत्रूला खालून मारा करता येत नाही. जंग्यांच्या अशा रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. प्रतापगडाच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस गुहा आहे.
प्रतापगडाचा पश्चिमाभिमूख दरवाजा तटबंदीत लपवलेला आहे. या महाद्वाराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तोफांचा मारा थेट दरवाजावर करता येऊ नये. जमिनीपासून उंचावर असल्यामुळे हत्ती किंवा ओंडक्यांनी धडका देवून दरवाजा तोडता येत नसे. महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांतसाठी देवड्या (विश्रांतीकक्ष) आहेत. यातील उजव्या बाजूच्या देवडीत एक प्रचंड तोफ ठेवलेली आहे. महाद्वारातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला लांबवर पसरलेली माची आहे. माची वरून वाट टेहाळणी बूरुजावर (जीवा महाला बुरुज) जाते. या बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. या बुरुजा खालीच वहानतळ आहे. बुरुजावरून प्रतापगडाचा बालेकिल्ला, जावळीचे खोरे व उजव्या बाजूला एका उंचवट्यावर असलेली अफजलखानाची कबर दृष्टीपथात येते.
शिवाजीराजांनी १६५५ रोजी विजापूरचा अदिलशाहचा सुभेदार चंद्रराव मोरे ह्याचा ताब्यात जावळीचा परिसर होता. हा भाग भौगोलिक दुष्ट्या पहिला तर  तेथे घनदाट झाडे असणारे जंगल होते कि सूर्यकिरण हि जमिनी पर्यंत पोचत नसत. शिवाजी राजे  यांनी मोरेना स्वराजचे काम करण्याची प्रवूत्त करण्याचा प्रयत्न  केला परंतु  त्या प्रयत्नाला यश आले नाही. त्यानंतर राज्यांनी मोऱ्यांना हल्ला करून सर्व परिसर ताब्यात घेतला. ह्या घटनेने विजापूरची आदिलशाही हादरली व त्यांनी विजापूर येथे दरबार भरवून शिवाजीराजांना जिवंत किंवा मृत पकडून आणायचा विडा अफजलखानाने घेतला व सुमारे ४०००० फौज घेऊन शिवाजी राजाना पकडण्यासाठी निघाला तो विजापूर ,तुळजापूर, पंढरपूर मार्गे लूटमार करत वाई पर्यंत पोचला. तो १२ वर्ष वाईचा सुभेदार होता परंतु तो कधी जावळीच्या खोऱ्यात उतरला नाही त्यामुळे त्याला ह्या परिसराची माहिती नसल्याचा फायदा राजांनी घेतला अफजल खानचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ह्या वकिलाला प्रतापगडावर पाठवले. त्याच्याशी बातचीत करून अफजलखानाच्या भेटीचे नियोजन प्रतापगडाच्या पायथ्याशी केले. जावळी खोऱ्यातील  घनदाट जंगल व अवघड दऱ्या खोऱ्यातील मार्ग मुले अफजलखानाला फक्त १२००० सैन्य घेऊन येणे शक्य झाले भेटीसाठी तयार केलेला शामयाना सोन्याचांदी आणि हियामोत्यांनी सजवण्यात आला त्यामुळे अफजलखानाला असे भासवण्यात आले कि शिवाजी राजे हे शरण येत आहे शिवाजी महाराज त्याच्या अंगरक्षक जिवा महाले तर अफजलखान हा त्याच्या अंगरक्षक सय्यद बंडा घेऊन भेटीसाठी आले  अफजलखान काही धूर्त खेळी करेल ह्याची कल्पना महाराजां होती व अफजलखाने त्याच्या नेहमीच्या धृत वृत्ती प्रमाणे महाराजांना आलिंगन देताना काटारीने पाठीवर हल्ला केला परंतु महाराजांनी स्वरक्षणा साठी घातलेले चिलखती मुळे बचावले गेले क्षणार्धाचा विचार न करता महाराजनी हातात घातलेले वाघ नख्याने अफजलखानाच्या पोट फाडले अफजल खानाच्या किंकाळी मुळे  सय्यद बंडा महाराजांवर चालून आला परंतु त्याला जिवा महालाने जागीच ठार केले  असा महाराजांनी अफजलखानचा खात्मा केला. महाराजांनी त्या दोघांची कंबर बांधली महाराजांच्या ह्या प्रतापामुळे ह्या गडाला प्रताप गाद असे नाव देण्यात आले 
ह्या गडाचे प्रवेशद्वार, तटबंदी, टेहळणी बुरुज, केदारेश्वर बुरुज, भवानी बुरुज, नगारखाना, पालखींगेट, छोटा दरबार, कडेलोट बुरुज, शिवाजीराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. 
  

गडावर कसे जाल



रस्त्याने

    1. मुंबई - पुणे - महाबळेश्वर हे अंतर २२० किमी आहे. मुंबई - पुणे येथून एसटीच्या बसेस व खाजगी बसेस आहेत. या प्रवासाला ६ ते ७ तास लागतात. महाबळेश्वरहून खाजगी वहानाने किंवा बसने ४० मिनिटात प्रतापगडाच्या पायथ्याशी जाता येते.
    2. मुंबई - गोवा महामार्गावरील पोलादपूरहून आंबेनळी घाटाने थेट प्रतापगडावर जाता येते. या मार्गाने मुंबई ते प्रतापगड अंतर २५१ किमी आहे. या प्रवासाला ६ ते ७ तास लागतात.
  • रेल्वेने

    सातारा हे महाबळेश्वरला जवळचे रेल्वेस्टेशन आहे. सातारा -वाई - महाबळेश्वर अंतर ६८ किमी आहे. या प्रवासाला २ तास लागतात.
  • विमानाने

    पुणे हे जवळचे विमानतळ महाबळेश्वरहून ११७ किमी अंतरावर आहे. या प्रवासाला ३ तास लागतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा