किल्ले रायगड :
रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते.
रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे असून त्याचे नाव “गंगासागर तलाव” असे आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग “महा-दरवाजा” मधून जातो. किल्ल्यामध्ये असलेल्या राज्याच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. सिहासनाजवळील भाग ध्वनीलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे कि दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरीत्या ऐकू येऊ शकतात. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज असून त्याला “हिरकणी बुरूज” असे म्हणतात.
'किल्ले रायगड ' ह्याचे प्राचीन नाव 'रायरी' निझामशाहीत ह्याचा उपयोग कैदेत ठेवण्यासाठी केला जात असे. शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस वेढा घातला व मे महिन्यात रायरीस स्वराजात शामिल केले. नंतर कल्याणचा सुभेदार हा खजिना घेउन विजापूरला घेऊन जात असल्याची माहिती शिवाजी राजांना समजली आणि त्यांनी तो लुटून सर्व खजिना रायगडावर आणला व त्याचा उपयोग त्यांनी गडाच्या बांधणी साठी केला. रायगड भोगोलिक दुष्ट्या चढाई करण्यास कठीण व तसेच सागरी व्यापारावर हि लक्ष ठेवता येईल या साठी त्यांनी रायगडाला राजधानी केले . गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणी बुरुज आहॆ उत्तरेकडे टकमक टोक आहॆ गडाच्या गंगासागर तलावासमोर दोन उंच मनोरे आहेत ते स्तंभ सुमारे पाच माज़ीले होते असे सांगण्यात येते गडावरील राजभवनाचा चौथरा सुमारे ८६ फूट लांबीला तर ३३ फूट रुंद आहॆ त्या काळी गुप्ता बोलणी साठी वापरण्यात येणाऱ्या खोली म्हणजेच खलबत खानाचे अवशेष आहॆ. महाराजांचा राजभिषेक जेथे झाला ते राज्यमंडप २२० फूट व लांब १२४ रुंद आहॆ गडावर त्याकाळी बाजारपेठ चे अवशेष पाहावयास मिळतात हा किल्ला अजून इतिहासाची साक्ष अजून ही देत उभा आहॆ
कसे पोहोचाल?:
विमानाने
जवळचे विमानतळ लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र ही आहेत.
रेल्वेने
सर्व पर्यटन स्थळासाठी मुंबई (सीएसटी), एलटीटी, कुर्ला टर्मिनस, पुणे रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्टेशन (रायगड जिल्ह्यात) भारतीय रेल्वेच्या मुख्य मार्गांसाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वेचे जवळचे रेल्वे स्थानक पेन्, रोहा, वीर इत्यादी आहेत. पनवेल जंक्शन जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. ते मुंबईला (हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वेचे मुख्य मार्ग), ठाणे (ट्रान्स हार्बर लाइन), रोहा, वसई (पश्चिम रेल्वे) याद्वारे जोडलेले आहे. नेरळहून माथेरान पर्यंत एक “नेरो गेज” रेल्वे मार्ग आहे, याला माथेरान हिल रेल्वे असे म्हणतात.
रस्त्याने
रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) बसांद्वारे रस्त्यांनी जोडलेली आहेत. रायगड जिल्हा सायन-पनवेल एक्सप्रेसवेने मुंबईशी जोडला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग हे पनवेल, खालापूर आणि खोपोलीमार्गे जातात. राष्ट्रीय महामार्ग १७, जो पनवेल येथे सुरु होतो , तो पोलादपूरमार्गे पूर्ण जिल्ह्तातून जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा