Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

मधुमकरंद गड

                              मधुमकरंद गड


महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये मधुमकरंद गड. मधुमकरंद गड हा सातारा जिल्यातील एक गाद गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून साधारणपणे ४०५० फूट उंचीवर असून प्रतापगडापासून साधारणपणे २७ कि.मी. तर महाबळेश्वर पासून ३७ कि.मी अंतरावर तर पुण्यापासून १५६ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे तर मुंबई पासून साधारणपणे २९० कि.मी. अंतरावर आहे. हा किल्ला जावळीच्या जंगलात आहे. मधुशिखर हे एक सातारा, रायगड व रत्नागिरी ह्या जिल्ह्याची सीमा आहे.
किल्ल्याच्या पायथ्याशी घोणसपूर गाव आहे व ह्या गावाच्या वरच्या बाजूनी गडावर जाण्यासाठी अरुंद अशी वाट आहे हि वाट घनदाट जंगलातून जाते. गडावर जाण्यासाठी साधारणपणे १ तास लागतो हा गाद दोन भागात आहे एक मधुशिखर आणि दुसरा मकरंदगड . गडाला जाताना नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या भोगोलिक बुरचनेचा उपयोग करण्यात आला उदा गडाचे प्रवेशद्वार नैसर्गिक रित्या तयार झालेल्या बुरुजात बनवलेले आहे. गडावर अनेक कातळात कोरलेले पाण्याचे तळ आहे. हे तळ फार प्राचीन काळी कोरलेली असावी. गडावर महादेवाचे मंदिर आहे. गडावर विशेष असे बांधकाम नाही. गडावरून अनेक गाद जसे प्रतापगड, वासोटा, रसाळगड, सुमारगड, माहिमनगड दिसतात ह्यामुळे हा किल्ला ह्या गडाचा एक दुवा असावा  तसेच कोयना धरणाचे शिवसागर जलाशय  व अभयारण्य दिसते. 
हा किल्ला शिवाजीमहाराजांनी १६५६ मध्ये प्रतापगडच्या बांधणीच्या वेळी बांधला हा गड पुढे १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. 
मार्ग - पुणे - महाबळेश्वर - घोणसगाव 
           मुंबई - महाबळेश्वर - घोणसगाव 

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

किल्ले भूषणगड

                          किल्ले भूषणगड 

 महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहितीमध्ये भूषणगड हा सातारा जिल्ह्यातील मन खटाव तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे हा समुद्रसपाटी पासून साधारणपणे २९७० फूट उंचीवर आहे. गडाच्या पायथ्याशी भूषणगड नावाचे छोटे से गाव आहे ह्या गावात येण्यासाठी चारी बाजूनी रस्ते आहेत. गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायर्यांवरून वर चढत असताना आपल्याला म्हसोबाचे मंदिर दिसते व त्या मंदिराच्या थोडे पुढे पायऱ्या चढत आल्यावर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वार पर्यंत पोचवतो. प्रवेशद्वाराची बांधणी हि गायमुखी पद्धतीची असून दरवाजाची कमान पडलेली आहे परंतु पहारिकऱ्यांसाठी असणारी देवड्या मात्र चांगल्या अवस्थेत आहे. ह्या दरवाज्याच्या सरळ वाटेने गेल्यास ती वाट आपल्याला गडाच्या पश्चिम कड्यावर नेते. व डावीकडील वाटेवर गेल्यास ती वाट आपल्याला गडाच्या माथ्यावर नेते. भूषणगड आकाराने छोटा आहे. गडाची तटबंदीची काही ठिकाणी पडझड झाली आहे. परुंतु बाकी तटबंदी सुअवेस्थेत आहे. गडाला अनेक बुरुज आहे. भूषणगडाचा आकार त्रिकोण असून तिन्ही कोन्याला बुरुज आहे. गडावर हरणामइ मातेचे मंदिर आहे. गडावरून औंधची यमाई, महिमानगड, शिखरशिंगणापूरही दृष्टीस पडतो.

भूषणगड हा आकाराने लहान असल्यामुळे त्याचा उपयोग टेहळणी साठी केला जात असावा व कोकण चिपळूण व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी एकला ताज असावा. हा गडाची बांधणी देवगिरीच्या शिंघान राजकर्ते सम्राट राजा शिंघान दुसरा याने केली. ह्या राजाचा कालखंड १२१० ते १२४७ असा आहे. पुढे हा किल्ला अदिलशाहीकडे गेला व पुढे तो स्वरजात आला इ.स. १६१७६ मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला व ह्याची फेरबांधणी केली पुढे हा गाद औरंगजेबाने जिंकलं व ह्याचे नांव इस्लामतर ठेवले पुढे तो पुन्हा स्वरजात आला. पुढे तो पेशवाई कडे गेला पुढे १८१८ रोजी हा गाद इंग्रजांकडे गेला 


मार्ग - सातारा, कराड, दहिवडी येथून वडूज वर येता येते. पुढे वडूज वरून ३० कि.मी. अंतरावर पळशी  गावात येता येते. पळशीवरून कच्च्या रस्त्याने आपण ५ कि.मी. अंतरावर भूषणगड गावात पोहचतो  
पुणे ते पळशी साधारणपणे १९० कि.मी. 
मुंबई ते पळशी साधारणपणे ३२० कि.मी. 

किल्ले भैरवगड

                            किल्ले भैरवगड

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये भैरवगड हा  सातारा जिल्ह्यातील  एक गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून साधारणपणे ३००० फूट उंचीवर आहे.  सह्याद्रीच्या पर्वत रांगेतल्या डोंगरात असून  किल्ला घनदाट दाट जंगलात वसलेला आहे. हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.  भैरवगडाच्या आजुबानूने अभयारण्याला 'टायगर रेसेर्वे ' घोषित केल्यामुळे हा संपूर्ण परिसर वनखात्याकडे असून हा गडावर जाण्यासाठी वन विभागाची लेखी परवानगी घ्यावी लागते.
भैरवगड साताऱ्याहून १६ कि.मी. व पुण्याहून १४० कि.मी. व मुंबईहून ८० कि.मी. अंतरावर असून गडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. दुर्गवाडी मार्ग, गव्हारे मार्ग, व पातेमार्ग. भैरवगडाच्या किल्ल्याचा डोंगरवार पोहचल्यावर एक बांधीव बुरुज व तेथेच वरच्या बाजूस कातळात कोरलेली गुहा दिसते गुहेपासून थोडे पुढे डोंगरावर वळसा मारून पुढे दरीच्या बाजूला बुरुज व दक्षिणमुखी दरवाजा आहे हा दरवाजा भग्न अवस्थेत आहे गडाच्या दक्षिणमुखी दरवाजाचा टेकड्यावरून मागच्या बाजूस गेल्यास पाण्याचे दोन टाक्या दिसतात. हा गडावर वर पाहण्यासाठी फार काही नाही. हा किल्ल्याचा उपयोग टेहळणी साठी करत असावे. आता हा किल्ला त्याच्या भवताली असेलल्या अभयारण्य मुळे व जंगली प्राण्यांमुळे हा किल्ला टर्रेकेर्स साठी उपयुक्त आहे. सह्यादीपर्वताच्या कुशीत नानाप्रकारच्या वनस्पती, झाडी, किडे, व कीटक येथे पाहावयास मिळतात
मार्ग -
१) हेळवाकच्या रामघळ मार्ग चिपळूण कराड रस्त्यावर कुभाजी घातपात केल्यावर हेळवाक गाव आहे तेथून मेढघर मार्ग कोंढावले धनगरवाड्याला गेल्यावर रामघळ लागते. ये रामघळीतूनच वर जाणारा रथ भैरवगडावर पोहचतो.
२)गव्हारे मार्ग - दुर्गवाडी गाव अगोदर गव्हारे गावाकडे जाणारा रास्ता लागतो हा गावातून जाणाऱ्या वाटेने गडावर जाण्याचा मार्ग आहे.
३) पाटमार्ग  - चिपळूणवरून गोव्याच्या दिशेला जाताना २१ कि.मी. वर 'आसुडी फाटा ' लागतो. तेथून डावीकडे वळल्यास पाते गावात जाता येते. व गावातून गडावर जाण्यास पायऱ्या आहेत. 

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

किल्ले वंदनगड

किल्ले वंदनगड


महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती किल्ले वंदनगड हा किल्ला सातारा जिल्यातील वाई तालुक्यात आहे. हा एक गिरिदुर्ग असूनसमुद्रसपाटी पासून ३८०० फूट उंचावर आहे.  साताऱ्या पासून साधारणपणे २५ कि.मी. अंतरावर तर पुण्यापासून साधारणपणे  ९० व मुंबईपासूनच्या २४० कि.मी अंतरावर हा किल्ला आहे. चंदन वंदन हि एक दुर्गजोडी असून हे किल्ले सह्याद्रीच्या महादेव ह्या उपरांगेवर स्थित आहे.
पुणे सातारा रोडवर भुईंज गाव पासून डावीकडे वळाल्यावर गडावर जाण्याचा मार्ग आहे . गडावर जाण्यासाठी दोन गर्ग आहे. एक इब्राहीमपूर गावाजवळून तर दुसरा बेलमाचीवरून. इब्राहीमपूर गावजळून दुधाणेवाडी वाहनाने जावे व पुढे १ कि.मी. ची चढाई केल्यास गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचता येते. हा सर्वात सोपा मार्ग आहे.गडाचे प्रवेशद्वार द्वार चांगल्या स्थितीत असून गडाच्या प्रवेशद्वारावर किर्तीचक्र व गणेशमूर्ती कोरलेली आहे. पुढे भोजकालीन दरवाजावर दोन   दुसरा मोडी लिपीमध्ये आहे. गडावर एक खंदक आहे. व पाच पाण्याचे तळे आहे. पुढे गेल्यास महादेवाचे छप्परी मंदिर आहे. गडाच्या मध्यभागी एक कोठार असून ते दारुगोळ्याची असावे. गडाचे बालेकिल्ला टेकडीवर असून त्याचे अवशेष आपल्यास पाहावयास मिळते. गडावर अनेक पडकी घराचे अवशेष दिसतात. तसेच चुन्याच्या घाणीचे अवशेष व गडाचा दक्षिणेस एक चोर द्वार आहे.

पुरातन तांब्रालेखानुसार हा किल्ला ११व्य शतकातील असून ह्या किल्ल्याची बांधणी शिलाहार वंशातील राजाभोजणे केली आहे. शिवाजी महारांजानी अफजलखानाच्या वधानंतर सातारा किल्ल्या जिंकल्यावर ह्या गडावर आक्रमण करून हे गड स्वराजात सामील करून घेतले व ह्या गडाचे णव शूरगाड नाव बदलून चंदनगड ठेवले. उचे संभाजी महारांच्या कारकिर्दीत १६८५ मध्ये अमातुल्य खानने ह्या गडावर हल्ला केला. पुढे १६८९ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता पुढे तो मोगलांकडे गेला. पुढे १७०७ मध्ये हा किल्ला शाहू महाराजांनी पुन्हा स्वराज्यांत आणला पुढे हा किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.
मार्ग - सातारा   - भुईंज -इब्राहिमपूर - दुधांवाडी
          पुणे - सातारा - भुईंज- इब्राहीमपूर-दुगणवाडी 
          मुंबई - सातारा - भुईंज - इब्राहीमपूर- दुधांवाडी 

किल्ले चंदनगड

                              किल्ले चंदनगड



महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती किल्ले चंदनगड हा किल्ला सातारा जिल्यातील कोरेगाव तालुक्यात आहे. हा एक गिरिदुर्ग असूनसमुद्रसपाटी पासून ३८०० फूट उंचावर आहे.  साताऱ्या पासून साधारणपणे २५ कि.मी. अंतरावर तर पुण्यापासून साधारणपणे  ९० व मुंबईपासूनच्या २४० कि.मी अंतरावर हा किल्ला आहे. चंदन वंदन हि एक दुर्गजोडी असून हे किल्ले सह्याद्रीच्या महादेव ह्या उपरांगेवर स्थित आहे.
पुणे सातारा रोडवर भुईंज गाव पासून डावीकडे वळाल्यावर गडावर जाण्याचा मार्ग आहे . गडावर जाण्यासाठी दोन गर्ग आहे. एक इब्राहीमपूर गावाजवळून तर दुसरा बेलमाचीवरून. इब्राहीमपूर गावजळून दुधाणेवाडी वाहनाने जावे व पुढे १ कि.मी. ची चढाई केल्यास गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचता येते. हा सर्वात सोपा मार्ग आहे.
गडाचे प्रवेश द्वार हे पडक्या अवस्थेत असून गडावर महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर शिवाजीमहाराजांनी बांधले आहे गडावर राजा बांधलेली दोन दगडी मिनार आहे. चांगडासाब्या पायथ्याशी मध्यभागी एक दगडी चौथरा आहे. दारुगोळा कोठार असून ह्या कोठाराच्या भिंडीतला छप्पर नाही. गडावर के विहीर आहे.
पुरातन तांब्रालेखानुसार हा किल्ला ११व्य शतकातील असून ह्या किल्ल्याची बांधणी शिलाहार वंशातील राजाभोजणे केली आहे. शिवाजी महारांजानी अफजलखानाच्या वधानंतर सातारा किल्ल्या जिंकल्यावर ह्या गडावर आक्रमण करून हे गड स्वराजात सामील करून घेतले व ह्या गडाचे णव शूरगाड नाव बदलून चंदनगड ठेवले. उचे संभाजी महारांच्या कारकिर्दीत १६८५ मध्ये अमातुल्य खानने ह्या गडावर हल्ला केला. पुढे १६८९ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता पुढे तो मोगलांकडे गेला. पुढे १७०७ मध्ये हा किल्ला शाहू महाराजांनी पुन्हा स्वराज्यांत आणला पुढे हा किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.








मार्ग - सातारा   - भुईंज -इबरहीमपूर-दुधांवाडी
           पुणे - सातारा   - भुईंज -इबरहीमपूर-दुधांवाडी
          मुंबई -सातारा   - भुईंज -इबरहीमपूर-दुधांवाडी

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

किल्ले महिमानगड

                        किल्ले महिमानगड 
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती किल्ले महिमानगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटी पासून साधारणपणे ३२००  उंचीवर हा किल्ला आहे. सातारा - फलटण डोंगररांगेतजील हा एक किल्ला आहे. हा किल्ला साताराहुन ५० कि.मी. अंतरावर तर पुण्याहून साधारणपणे १६५ कि.मी अंतरावर तर मुंबई पासून साधारणपणे ३१० कि.मी अंतरावर हा  किल्ला आहे. महिमान गावाच्या दक्षिण पायथ्याशी महिमान गाद वाडी आहे. व उकिरडकडूनहि गडाला जायचा मार्ग आहे. हा मार्ग थोडा अवघड आहे. महिमान गडाच्या फाट्यापासून गडाचा पायथा असलेल्या गाव पर्यंत गाडीने जात येते. महिमानगड वाडी उतारावर  वसलेली आहे. वाडीतील मंदिरपासून गडावर जायला एक वाट आहे. बया वाटेवरूनच गडाच्या दरवाजचे बुरुज दिसतात. या वाटेने वर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीत पाण्याची टाकी कोरलेली आहे. पुढे गडात शिरणारा मार्ग दिसतो इथल्या तटबंदी वर अनेक झाडे उगवली दिसतात त्यामुळे दरवाजाची कामं ढासळून नष्ट झाली आहे. फक्त कमानीचे उभे खांब शिल्लक आहेत. या दगडांच्या खांबावर सुरेख हत्ती कोरलेले आहे. दरवाजाची बांधणी गोमुख पध्द्तीची आहे. दरवाजातून आत प्रवेश केल्यास डावीकडील वाट गडाच्या मान्यवर जाते. तटबंदीला अनेक बुरुज आहेत. गडाचा पश्चिम भाग रुंद असून तो पूर्वेकडे निमुळता होत गेलेला आहे. व त्या टोकावर टेहळणीसाठी एक बुरुज आहे. या तटबंदीला दोन दिंडी दरवाजे आहेत गडाच्या  मथयवरून भूषणगड, वर्धनगड हे किल्ले दिसतात व मोळघाट परिसर दिसतो. 


ह्या किल्ल्याचा उपयोग साताऱ्याच्या पूर्वकडील प्रांताचे संरक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे केले घेतले व बांधले त्या किल्ल्या पैकी एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरिता महार रामोशी मिळून ७५ इसम गडावर ठेवले होते. किल्ल्याचा हवालदार पाहणी सबनीस यायची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुलकर्णी यांच्याकडे चालू आहे. 
                                      
मार्ग - साताऱ्याहून माहिमगड ५० कि. मी. असून  सातारा पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या पुचे १२ कि.मी. अंतरावर असणाऱ्या महिमानगड फाट्यापासून पुढे जातो. दहिवडी कडून साताऱ्याकडे येणाऱ्या रस्त्यावरून सुद्धा महिमानगड फाट्यावर उतरता येते. महिमानगड फाट्यावरून महिमानगड गावात २० मिनिट लागतात.    

किल्ले वर्धनगड

                             किल्ले वर्धनगड 

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये वर्धमान हा किल्ला सातारा जिल्यातील फलटण तालुक्यातील आहे. हा एक गिरिदुर्ग आहे. हा समुद्रसपाटीपासून १५०० फूट उंचीवर आहे. सह्याद्रीची एक रांग माण देशातून जाते ते महादेव डोंगररांग आहे. ह्या डोंगररांगेवर स्थित आहे. वर्धनगाव हे किल्ल्याच्या पायथ्याशी  आहे. पुणे ते वर्धनगड हे १३२ कि.मी. आहे. तर मुंबई ते वर्धनगड साधारणपणे २७३ कि.मी आहे वर्धनगड गावातून किल्ल्याची तटबंदी दिसते गावातून किल्ल्यावर  प्रशस्थ वाट आहे. हि वाट गडाच्या पायथ्याशी जाते गडाच्या प्रवेशद्वाराची गोमुखी बांधणी आहे. किल्ल्याची पूर्ण तटबंधी सुस्थितीत आहे. दरवाजाच्या आत गेल्यास डावीकडे एक ध्वजसंभ आहे व पुढे गेल्यावर एक चोर वाट  आपल्याला गडाच्या तटाबाहेर घेऊन जाते. दरवाजाच्या पुढेच पायऱ्या दिसतात ते चढून वर जाताना त्या टेकडावरती होण्याची भग्न मूर्ती  आहे पुढे महादेवाचे मंदिर आहे. व मंदिराशेजारीच पाण्याचे टाके आहे. टेकडावर वर्धनीमातेचे मंदिर आहे मंदिराच्या मागच्या बाजूने टेकडावरून एक वाट खाली उतरली या वाटेने उतरताना उजवीकडे  आढळतात

हा गडाच्या इतिहासानुसार हा किल्ला शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये बांधावयास सुरवात झाली. व ह्या गडाचे काम १६७४ रोजी पूर्ण झाले. ५ मे १७०१ या दिवशी मोघलानी पन्हाळा जिंकल्यावर औरंजेबाने  पुढचे लक्ष सातारा होते त्यासाठी त्याने मोघल सरदार फत्तेउल्लाखानची ह्या कामगिरी साठी नेमणूक केली तेव्हा वर्धमानगडावर हा मोघल सरदार हल्ला करेल ह्या पूर्ण कल्पना किल्लेदारास होती व त्या बाबतीत ची तयारी किल्लेदारणाने सुरु केली त्याने किल्ल्याच्या  पायथ्यालगतचे गाव व वाड्या खाली करून घेतला मोघलच्या सरदाराने जसे खटावचे ठाणे जिंकले त्याने वर्धनगडावर चाल करण्याचे नियोजन केले ह्याची कल्पना किल्लेदारास आली व तेव्हा वेळखाऊपणा करण्यासाठी त्याने मुघल सरदाराकडे एक वकील पाठवला  व त्यास जर किल्लेदाराच्या प्राणाचे अभय दिल्यास किल्लेदार किल्ला मोघलांना देण्यास तयार होईल असे सांगितले. मुघल दाणेदार किलदाराची वाट बाहेत राहिला परुंतु त्याला किलदाराच्या युक्तीची  कल्पना आली व त्याने वर्धनगडावर हल्ला केला. मुघल व मराठे यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले व शेवटी मोघलांनी हा गड जिंकलं व गडाचे नांव बदलून सादिकगड ठेवले  परंतु औरंजेबाची पाठ फिरतातच हा किल्ला मराठ्यांनी परत जिंकला व त्याचे नाव सादिकगड बदलून वर्धनगड केले.



 मार्ग -  सातारा - वर्धनगड ५७ कि.मी.
           पुणे - सातारा- वर्धनगड  १३२ कि.मी.
          मुंबई  - सातारा - वर्धनगड २७३ कि.मी. 

किल्ले संतोषगड

                             किल्ले संतोषगड 

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये संतोषगड हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे. हा किल्ला पुण्यापासून १६० कि. मी. असून मुंबईपासून ३१० कि.मी. आहे. हा किल्ला समुद्रसपाटी पासून साधारणपणे २९०० फूट उंचीवर आहे.  किल्ल्याच्या पायथ्याशी ताथवडे गाव आहे. त्यामुळे त्या ताथवडेचा किल्ला असे म्हणतात. सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागामध्ये विभागलेली आहे. शंभू महादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग या पैकी म्हसोबा डोंगर रांगेवर हा किल्ला आहे. साताऱ्यापासून ५५ ते ६० कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला आकाराने छोटा आहे हा किल्ल्याचा उपयोग फलटण भागावर टेहळणी साठी केला जातो.
                                                       
ताथवडे  पायथ्यावरील गाव असून त्या गावात एक मंदिर आहे. त्या मंदिरावरून असे समजते कि किल्ला १६६२ मध्ये शिवाजी महाराजांनी बांधला आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गावर एक मठ आहे व मठाच्या बाजूला एक गुहा असून त्यात वाल्मिकी ऋषींची मूर्ती आहे पुढे किल्ल्याच्या दरवाजा  किल्ल्याचा दरवाजाची पडझड झाली असून पहारेकऱ्यांच्या देवड्या मात्र शिल्लक राहिले आहेत दरवाजाच्या पुढे गेल्यावर मात्र हनुमानाचे टाक आहे व पुढे गेल्यावर वाड्याचे व घराचे अवशेष आहेत. व पुढे धान्याचे कोठार आहे. ह्या धान्याच्या कोठाराच्या फक्त भिंती उभ्या राहिले आहे. पुढे गेल्यास पाण्याचे टाक असून टाक्यात उतरण्यासाठी चक्क कातळ भिंडीला भोक पाडून पायऱ्या केल्या आहेत. किल्ल्याची तटबंदी सुस्थितीत आहे. गडाच्या वाट महाद्वाराच्या कमानी पडक्या विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्याना पायबंद बसावा यासाठी ह्या गडाची उभारणी केली. 


हा किल्ला शिवाजी महाराजांनी १६६६ साली बांधला असून तो  नाईक निबाळकर याच्याकडे किल्ल्याची सूत्रे हाती दिली. परंतु त्याच वर्षी पुरंदरच्या तहात हा गड मोगलांकडे गेला परंतु  राजकर्त्याने हा गड त्याच्या ताब्यात घेतला शिवाजी महाराजांनी हा गड त्याच्या ताब्यात घेतला शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६७३ मध्ये मुघलांनी पुन्हा हा गड जिंकलं. पुन्हा हा किल्ला १७२० रोजी शाहू महाराजांच्या हाती दिला. पुढे १८१८ साली हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा इंग्रजांनी ह्या गडाची भरपूर नासधूस केली  गेली. 
                                
मार्ग - किल्ल्यावर जाण्यसासाठी फलटण व सातारा दोन्ही शहरातून जात येते. 
ताथवडे - ताथवडेला अनेक मार्गानी पोहचला येते फलटण ते ताथवडे अशी एस. टी हे अंतर १९ कि.मी. आहे. 
सातारा - साताऱ्याहून पुसेगाव साधारणपणे २३ कि.मी. आहे. मोळघाट मार्ग फलटणला जाणाऱ्या बसने ताथवडेला उतरता येते.                

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

किल्ले सज्जनगड

                          किल्ले सज्जनगड

 महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये सज्जनगड किल्ला सातारा जिल्यातील परळी तालुक्यातील  असून  हा एक गिरिदुर्ग आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारणपणे ३३५० फूट उंचीवर आहे अस्वलायन ऋषींचे हा डोंगरावर वास्तवाचे स्थान होते म्हणून त्यास अस्वलयानगड म्हणतात.  पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव  नावाने पूर्वीकडे जाते बया रांगेला तीन फाटे फुटतात त्यापैकी रांगेवर सज्जनगड हा किल्ला आहे. किल्ल्याचा आकार हा एक शंखाकृती आहे.  पुण्य पासून परळी १२५ कि.मी. व मुंबई पासून २६६ कि.मी आहे.
ह्या किल्ल्याला दोन दरवाजे आहे एक छत्रपती  महाराज द्वार व दुसरे समर्थ द्वार . ह्या किल्ल्यावर रामदास स्वामी यांची समाधी आहे. किल्ल्यावर मारुतीचे व गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या दरवाजात मारुती व वराहची मूर्ती आहे प्रवेश द्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर असून मंदिरा लगत अशोकवन वेणाबाई वृदावन, ओवऱ्या, अक्काबाईचे वृंदावन आणि समर्थांचा मठ या वास्तू आहेत. राममंदिर व मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाजायने पश्चिमेस गेल्यास उजव्या हातास एक चौथरा आहे व  शेकरु फासलेला गोटा आहे त्यास ब्रम्हपिसा म्हणतात. गडाच्या पश्चिमेच्या टोकावर मारुती मंदिर अशे त्याला धाब्याचा मारुती असे म्हणतात. तसेच गडावर गावमारुती व कल्याण स्वामींचे मंदिर आहे. तसेच रामघळ हुह आहे. सज्जनगडाच्या पायथाशी परळी गावंलागेतच केदारेश्वर व विरुपाक्ष अशी दोन प्राचीन मंदिर आहेत व कुसगावापासून जवळच मोरगळ नावाची गुहा आहे.
                             
ह्या किल्ल्याची उभारणी ११ व्या शतकातील असून शिलाहार वंशातील राजभोज राजाने केले गेली असा इतिहास आहे. पुढे १६७३ मध्ये शिवरायांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकला व त्याचा समावेश स्वराजात केला. इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींनी ह्या गडावर देह ठेवला पुढे २१ एप्रिल ए.स. १७०० मध्ये फत्तेउल्लखाने सज्जनगडास वेढा घातला व ६ जून १७०० मध्ये ताब्यात घेतला व  त्याचे नाव नवरसातारा ठेवले. परंतु १७०९ रोजी मराठयानी हा गड पुन्हा जिंकला व इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
 मार्ग - ह्या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) परळीपासून -  साताऱ्यापासून ते परळी अंतर १० कि.मी. चे आहे. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
२) गजवडीपासून - साताऱ्यापासून गजवाडी ७ कि.मी आउंटावर तेथून थेट गडाच्या कातळ मोथ्या पर्यांतगाडीने जात येते
साताऱ्यापासून एस. टी ने  परळी पर्यंत व गाजवादी पर्यंत येता येते.

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

वसोटा किल्ला (व्याघ्रगड )


                     वसोटा किल्ला (व्याघ्रगड )



महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये  वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असून हा किल्ला वनदुर्ग प्रकारात मोडतो परंतु हा किल्ला जास्त उंचीवर असल्याकारणाने ह्या किल्ल्याला गिरिदुर्ग ही  म्हणतात. हा किल्ला समुद्रसपाटी पासून ४२६७ फूट उंचीवर आहे.हा किल्ला पुण्यापासून २२६ कि,मी. दूर असून मुंबई पासून २६२ कि.मी. दूर आहे. हा किल्ला जावळीच्या जंगलामध्ये आहे. सह्याद्रीची मुख्य रांग हि दक्षिणउत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी घेरा दतगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वर पासून दातेगडापर्यंत जाते या दोन रांगा मधून कोयना नदी वाहते. जावळीच्या खोऱ्या मधून वाहण्याऱ्या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात
                              
ह्या गडावर जाण्यासाठी सातारा ते कास पठार व कास पठार ते बामणोली गाव असा आहे. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाजवळ वसलेले आहे. ह्या गावाजवळ बोटी उपलब्ध आहेत. वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी ग्रुप बरोबरच जावे लागते. वासोटावर जाण्यासाठी बोटीचे बुकिंग व वनविभागाची परवानगी लागते. शिवसागर जलाशयातून साधारणपणे १ तास बोटीचा प्रवास करावा लागतो. बोटीने जाताना कोयना नदी, कांदेर नदी व सोशी नदी ह्या नद्यांचा संगम पाहावयास मिळतो. पुढे आपण वासोट्याच्या पायथ्याशी असणारे मेट इंदवली गावाजवळ पोहचतो या पुढे ४ कि. मी. जंगलातून प्रवास असतो. जंगलात प्रवेश करण्याआधी तुमच्याकडे असणाऱ्या प्रत्येक वस्तूची मोजणी केली असते. विशेष करून प्लास्टिक कारण आपल्याकडून कोणतेही प्लास्टिक किंवा इतर वस्तू येथे राहिल्यास त्याचा दुष्परिणाम जंगलातील प्राण्यावर होऊ शकतो. ह्या जंगलात अनके रानटी प्राणी आहेत. वाघ, बिबट्या अस्वल या सारखे अनेक प्राणी आहेत. जंगलातून जाताना अनेक पाण्याचे झरे लागतात. किल्ल्यावर जाताना बिस्कीट घ्यावे.
किल्ल्यावर गेल्यावर किल्ल्याचा प्रवेशद्वार पडक्या अवस्थेत आहे व पुढेच हनुमानाची मूर्ती आहे. किल्ल्यावर अनेक वाड्याचे अवशेष आहेत चुन्याचा घाना, पाण्याच्या टाक्या दिसतात. ह्या किल्ल्याच्या बाबू कड्यावरून जुना वासोटा किल्ला दिसतो त्या किल्ल्या कडे जाण्यासाठी जॉन्टी वाट नसल्या कारणाने व जंगली प्राणी असल्यामुळे त्या गडावर कोणीही जात नाही. महादेवाचे मंदिराची डागडुगी केलेली दिसते. किल्ल्यावर एक माची आहे त्याला कालकाईचे ठाण म्हणतात. गडावरून नागेश्वरची गुहा दिसते. किल्ल्यापासून बोटीपर्यंत सूर्यास्तापर्यंत जावे कारण जलाशयातून सूर्यास्त पाहणे एक अविस्मरणीय क्षण असतो.
हा किल्ला शिलाहार कालीन असून ह्या गडाची बांधणी शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली. शिवाजी महाराजांनीं जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले जिंकले पण वासोटा दूर असल्याकारणाने हा किल्ला घेतला नाही पुढे शिवाजी महाराज पन्हाळ किल्ल्यावर अडकले असताना आपल्या मुख्यत्यारित मावळातील पायदळ पाठवून त्यांनी अवोस किल्ला ६ जून १६६० साली जिंकला व गडाला व्याघ्रगड असे नाव ठेवले. ह्या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात. याचे कारण निर्जन व घनदाट असे अरण्य व ह्या जंगलात वाघ व बिबट्या या सारखे अनेक प्राणी होते. आणि अजूनही आहेत
                             

मार्ग - वासोट्याला जाण्यासाठी प्रमुख दोन मार्ग आहेत
           १) कोकण - चिपळूण कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे  गावापर्यंत गाडीमार्ग असून या                 मार्गावर एस. टी बसच्या गाड्या आहेत चोरवणे पासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे                      येता येते.

           २) सातारा-कास पठार - बामणेली हा मार्ग जास्त सोयीचा आहे हा गाडीमार्ग असून यावर एस. टी बसेस                 आहे.
              

बुधवार, १ एप्रिल, २०२०

किल्ले दातेगड ( सुंदरगड )

                     किल्ले दातेगड ( सुंदरगड ) 



महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये दातेगड हा सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील किल्ला ऑन हा एक गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटी पासून साधारणपणे १०२७ फूट उंचीवर आहे. हा किल्ला बामणोली डोंगररांगेत आहे. या गडाची तटबंदी नैसर्गिक काळ्या कातळाची असून गडावर जेवढ्या वास्तू आहेत त्या पाषाणात कोरलेल्या आहे. दातेगड हा सातारा शहरापासून साधारणपणे ७५ कि..मी आहे. तर पाटण पासून १५ कि.मी. आहे. पुण्यापासून साधारणपणे १९० कि.मी. आहे. तर मुबईपासून ३३० कि . मी.
गड्याच्या पायथ्याशी टोळेवाडी असून टोळेवाडी पार   केल्यानतंर पायर्यांच्या वाटेने गडावर पोहचता येते. हा गड ५ एकर मध्ये विस्तारलेला आहे. गडाचे प्रवेशद्वार भग्न अवस्थेत आहे. असे म्हणतात हा दरवाजा १९६७ च्या कोयना भूकंपात कोसळला आहे. या पश्चिम तटावरील भग्न दरवाजा शेजारी ६ फूट उंच असेल गणपंतीची मूर्ती आहे. तेथून थोडे पुढे गेल्यास खडकात खोदलेली विहीर आहे. व त्याच विहिरीमध्ये तळाशी महादेवाचे खडकात कोरलेले मंदिर आहे. या मंदिरात शिवलींग या नक्षीदार नंदी हाये. गडाच्या एका बाजूची तटबंदी अजून चांगल्या अस्वस्थेत आहे. पहारेकरांसाठी देवड्या, धान्य कोठार, वाड्याचे अवशेष पाहावयास मिळतात.
                                              
दातेगडाचा फारसा इतिहास उपलब्ध नसून ह्याच्या कोरीव कामानुसार तो प्राचीन असावा. मध्य युगामध्ये चिपळूण, पाटण, विजापूर,विजयनगर हा मार्गावर बांधलेल्या गडांपैकी एक .  शिवाजी महाराजांच्या काळात दातेगडास सुंदरगड असे नाव होते. त्यात शिवाजी महाराज स्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती या शिवबंदी करिता गडाशेजारी गावातील जागा नेमून देण्यात आल्या होत्या पाटणकर हे देशमुख म्हणून स्वराजाचे काम पाहत. व या किल्ल्याचे अधिपत्य सुद्धा त्यांच्याकडे होते. शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला महालांच्या अधिपत्या खाली गेला व १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात न लढताच गेला

मार्ग - सातारा - पाटण - टोळेवाडी
          पुणे - सातारा - पाटण - टोळेवाडी
          मुंबई - सातारा -पाटण - टोळेवाडी    

किल्ले गुणवंतगड (मोरगिरी किल्ला )

                 किल्ले गुणवंतगड (मोरगिरी किल्ला )                            

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले गुणवंत  हा सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील असून हा एक गिरिदुर्ग असून समुद्र सपाटी पासून १००० फूट उंचीवर आहे. गडाच्या पायथ्याशी मोरगिरी गाव असल्यामुळे ह्याला मोरगिरीचा किल्ला असे म्हणत असावेत. पुण्याहून हा किल्ला साधारण पणे १८४ कि.मी. अंतरावर असून मुंबई पासून हा किल्ला ३२६ कि.मी अंतरावर आहे. हा किल्ला बामणोली डोंगरावर आहे. सातारा जिल्ह्याच्या पाटण गावापासून साधारणपणे १० कि.मी. अंतरावर हा गड आहे. ह्या किल्ल्याच्या शेजारीच दातेगड आहे व ह्या दोन्ही गडमधून कोयना नदी आणि हेळवाक - पाटण रस्त्या जातो हा किल्ला भग्न अवस्थेत गडावर किल्ल्याची तटबंदी  दिसत नाही. व ह्या  इतिहास हि  उपलब्ध नाही या गडावर फक्त एक विहीर आहे.व ३ ते ४ पाण्याचे टाक आहे. ह्या गडाचा वापर टेहळणी साठी किंवा सैन्यतळ म्हणून उपयोग केला जात असावा. हा किल्ला इ. स. १८१८ ला पेशवाई चा पाडाव इंग्रजांनी केला तेव्हा हा गड इंग्रजनाच्या ताब्यात गेला. 
मार्ग - गुणवंत गड पाटण असून ३ ते ४ कि. अंतरावर 
          पुणे ते पाटण १७४. कि.मी. पाटण ते मोरगाव १० कि.मी. 
          मुंबई ते पाटण ३१६ कमी  पाटण ते मोरगाव १० कि.मी. 

किल्ले अजिंक्यतारा

                          किल्ले अजिंक्यतारा
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये  अजिंक्यतारा हा गाद सातारा जिल्ह्यातील सातारा शहरात असून सातारा शहरापासून ३ कि. मी. अंतरावर आहे. पुण्याहून साधारणपणे ११८ कि. मी. तर मुंबईहून २५९ कि.मी. अंतरावर आहे. हा एक गिरिदुर्ग असून समुद्रसपाटीपासून साधारणपणे ४४०० फूट उंचीवर अशे हा किल्ला बामणोली डोंगररांगेत आहे हा किल्ल्या सातारा शहरात असल्याने सातारा एस. टी स्थनांकापासून अदालतवाड्या मार्गे जाण्याऱ्या कोणत्याही  अदालत वाड्यापाशी उतरून किल्ल्यावर जातात येते. व तसेच सातारा - राजवाडा अशी बससेवा दर १०-१५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बसस्थानका पासून अदालत विद्यापर्यत चाल जावे लागेल अदालत वाड्यापासून साधारणपणे १ कि.मी. चालत गेल्यास गडाच्या दरवाजापाशी पोहचतो.

गडावर प्रवेश केलेल्या मार्गावर दोन दरवाजे आहेत. व दोन वुरूज दृष्टीस पडतात. दरवाज्यातून आत गेल्यावर हनुमानाचे मंदिर आहे व थोडे पुणे गेल्यावर महादेवाचे मंदिर आहे. गडावर प्रसारभारती चे कार्यालय आहे व मागे पँझरबार्टीचे टॉवर आहे. थोडे पुढे गेल्यावर मंगळादेवीचे मंदिर व मंदिरापुढचं मंगळा बुरुज आहे. गडाच्या तटबंदीवरून फिरत येते गडाच्या दुसऱ्या बाजूस सुद्धा दोन दरवाजे आहेत. त्या दरवाज्या जवळच पाण्याचे नवीन तलाव आहेत परंतु त्यांना उन्हाळ्यात पाणी नसते.
गडावरून यव्तेश्वरचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो.
ह्या गडाचा इतिहास पहिला तर सातारा किल्ला उर्फ अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी होय. हा कोलला शिलाहार वंशातील दुसऱ्या भोज राजाने इ.स. ११८० मध्ये बांधला पुजेधे हा किल्ला बहमनी सत्तेत व पुढे विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ. १५८० पहिल्या आदिलशाही पत्नी चाँदबिबी येथे कैदेत होती. १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजीमहाराजांनी जिंकून स्वराजात सामील केला शिवाजीराजांच्या मृत्यू नंतर हा किल्लाला औरंगज़ेबाने वेढा दिला व १७०० मध्ये तब्ब्ल ४ महिनेच्या लढ्यानंतर हा किल्ला दुघलाईनच्या ताब्यात गेला व ह्या किल्ल्याचे नाव जम्तर ठेवले. पुढे ताराराणी सैन्याने हा किल्ला पुढे जिंकलं व त्याचे नाव पुन्हा अजिंक्यतारा ठेवले. पुढे हा किल्ला पुन्हा मुघलच्या ताब्यात गेला तेव्हा शाहू महाराजांनी पुन्हा हा किल्ला घेतला व १७०८ रोजी त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक केला.  या गडावरून कारभार पाहताना छत्रपती शाहूंनी सातारा शहराची स्थापना केली. पुढे मात्र १८१८ रोजी हा किल्ल्या इंग्रजांच्या ताब्यात गेला
मार्ग - पुणे- सातारा  एस टी किंवा खाजगी वाहनाने
         मुंबई - सातारा  एस टी किंवा खाजगी वाहनाने