Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

कमळगड ( कातळगड )


                        कमळगड ( कातळगड )


महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये कमळगड उर्फ कातळगड हा गड साताऱ्या जिल्हातील वाई तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग असून समुद्रसपाटी पासून साधारणपणे ४२०० फिट उंचीवर आहे. हा किल्ला पुण्यापासून ११९ कि.मी. असून मुंबईहून २६० कि.मी आहे. हा किल्ला धोम धरणाच्या जलाशयाच्या मागील बाजूस पुढे आलेल्या एका डोंगर रांगेवर आहे. ह्या डोंगरयाच्या दोन्ही बाजूनी पाण्याचा वेडा आहे. दक्षिण बाजूस कृष्णा नदीचे खोरे तर उत्तर बाजूस वाळकी नदीचे खोरे आहे.
                               
तुपेवाडी हि गडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांपैकी एक. हे गाव ३०कि.मी वाई वरून तर ४६ कि.मी भोरवरून गडावर चढाईचा मार्ग तुपेवाडी दक्षिण बाजूने चालू होतो हा मार्गे सोपा व सुरक्षित आहे. हा मार्ग दोन्ही बाजूने झाडाने वेढलेला आहे. हा मार्ग आपल्याला कमलमाची पर्यंत पोहचवतो. ह्या माचीवर जांभूळाच्या झाडी आहेत. वरती एक लोणगाव आहे. ते गावकरी आपल्या राहण्याची व जेवण्याची सोय कमी दरामध्ये करतात. येथून २० मिनिटातच गडाच्या बालेकिल्ल्यावर पोचतो. बालेकिल्ला सभोवती असलेल्या जंगलपेक्षा ३० ते ४० फूट उंचीवर आहे. हा गड ३-४ एकर पठारावर पसरलेला आहे गडावर कोणतेही वास्तू नाही कोणता बुरुज किंवा महाल आणि दरवाजा सुद्धा नाही उंच व खोल दगडच या गडाचे तटबंदी आहे.
                              
गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. त्याला नवरा नवरी चे डोंगर म्हणतात. पुढे ४०-५० फूट रुंद भुयार आहे. व त्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहे. तिला गेरूची अंडी कवीची विहीर म्हणतात ह्या विहिरीच्या ५०- ५५ पायऱ्या उतरल्यावर तळाशी पोहचतो तळाच्या चोहूबाजूस खोल कपारी असून सर्वत्र गेरू आणि काव याची ओलसर माती आहे हे सोडल्यास गडावर कोणतेही अजून टाक  नाही
गडावरून केंजळगड, रायरेश्वराचे पठार, काळेश्वराचे पठार, पाचगणी, धोम धरण दृष्टीस पडते.
मार्ग - 
महाबळेश्वरहुन केट्स पॉईंटवरून खाली येणाऱ्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोऱ्यात उतरते कि सुमारे दोन तासात समोरच्या डोंगरउतारावरील नांदवणे गावी पोहचता येते व त्या वस्तीवरून दोन अडीच तासात कमळगडावर पोहचतो.
वाई - वाईहून नंदवणे गावी येण्यास एस. टी आहे
पुणे - पुणे ते वाई ९० कि. मी. व वाई वरून नांदवणे गाव
मुंबई - मुंबई तेवाई २३० कि. मी. व वाई वरून नंदवणे गाव  

किल्ले केंजळगड

                            किल्ले केंजळगड

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये केंजळ्गड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग असून त्यांची उंची ४२६९ फीट आहे. केंजळगड हा कृष्णा व नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एक डोंगरवार आहे त्याला महादे डोंगररांग हि म्हणतात. ह्या गडाच्या एक बाजूला धोम येथे कृष्णा धरण तर दुसरा बाजूला नीरा नदीवर देवघर धरण व जवळच रायरेश्वर, रोहिडा, कमळगड हे किल्ले दिसतात. ह्या किल्ल्याचे पठार लहान आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार पडलेल्या अवस्थेत असून इंग्रजांनी ह्या किल्ल्याची भरपूर नासधूस केली आहे. गडावर केंजळादेवीचे मंदिराचे अवशेष आहे. व  दोन चुनाभट्टी आहेत. व गडावर ३ मोठया व ६ लहान पाण्याच्या टाक्या आहेत.


इतिहासानुसार हा किल्ला पन्हाळच्या भोज राजाने १२शतकात बांधला पुढे तो १६४८ साली बिजापूरचा आदिलशाहने जिंकला. छत्रपती शिवाजीराजांनी वाई व भोर भागातील बहुतेक किल्ले जिंकले परंतु हा किल्ला खूप काळ स्वराजात नव्हता. पुढे १६९४ रोजी चिपळूणच्या मोहिमेच्या वेळेला हा किल्ला जिंकला पुढे १७०१ रोजी औरंगज़ेब याने हा गड जिंकला. १७०२ लाच हा गाद मराठ्यांनी हा गड पुन्हा स्वराजात आणला पुढे १८१८ ला जेव्हा पेशवचा पाडाव झाला तेव्हा हा गड सुद्धा जिंकला.


हा किल्ल्या वाई वरून २५ कि.मी. रस्त्याने आहे. तर भोरवरून रस्त्याने १७ कि.मी. आहे ह्या गडावर जवळील मार्ग हा पायथ्यशी असणाऱ्या घेरा केंजळ या पासून अर्धा ते एक तासात या गडावर पोचवतो ह्या गडावर तिन्ही ऋतूमध्ये जात येते.
मार्ग - मुंबई -सातारा -कोल्हापूर महामार्गावरून साताऱ्याच्या वाई व वाई च्या पुढे १८-२० कि.मी अंतरावर एस ती ने जीप ने किंवा खाजगी गाडीने खावली या गावातून केंजळगडास जाण्याचा मार्ग आहे. महाराष्ट्र सरकारने गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाण्यासाठी रस्ता बनवला आहे. 

किल्ले हडसर (पर्वतगड)

                        किल्ले हडसर (पर्वतगड)

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये हडसर किल्ला उर्फ पर्वतगड  पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून समुद्रसपाटी पासून ४६८० फीट आहे. पुण्यापासून साधारणपणे १०५ कि.मी. असून मुंबई पासून १५६ कि.मी आहे हडसर हे या गडाच्या पायथ्याशी असणारे गाव आहे. जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवडा यापैकी कोणतीही बस पकडून तासाभरात हडसर या गावी जात येते. हडसर गावातून डोंगरापर्यंत जाताना लागलेला पठारावरून ह्या किल्ल्याची तटबंदी दिसते साधारणपणे अर्धा तास चालून गेल्यावर बुरुजापर्यंत पोहचता येते व थोडी चढाई करून किल्ल्याच्या द्वारा पर्यंत पोचता येते. व थोडी चढाई करून किल्याच्या द्वारापर्यंत जाताना डोंगरकरपर्यंत कोरलेल्या दोन टाक दिसते पुढे वळण घेऊन १०० पायऱ्याचढून खिंडीच्या मुख्य दरवाजापाशी पोहचता येते. हि राजदरवाजाची वाट आहे. हा दरवाजा बोगदे वजा प्रवेशमार्गावरची उत्कृष्ट नमुना दरवाजाची दुक्कल नलोन खोदलेल्या पायऱ्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वार आहें. गडावरील मुख्य दरवाजातून दोन वाटत फुटत. एक वाट तोडावेत जाते तर दुसरी प्रवेश द्वाराकडे जाते. दुसऱ्या दरवाजातून वरती आल्यावर पाण्याचे एक ताई आहे. त्याच्या डावीकडे वळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्थ कोठारे दिसतात. त्याच्या बांधकामावर गणेश प्रतिमा कोरलेल्या हायेत तेथून उजवीकडे वळल्यास मोठा तलाव लागतो व पुढे महादेवाचे मंदिर हि लागते मंदिराच्या समोरच भक्कम बुरुज आहे व एक तलाव आहे व तेथून पुढे गेल्यास खडकात कोरलेली प्रशस्थ गुहा आहे
ह्या गडावरून माणिकडोह जलाशयाचा परिसर, चावंड, नाणेघाट, शिवनेरी, भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर दिसतो.
 
हा किल्ला सातवाहन कालीन असून असून नाणे घाटाच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधला आहे. नाणे घाट हा पूर्वीचा व्यापारी मार्ग होता. त्या कारणास्तव ह्या किल्ल्याला खूपच महत्व होते.  तसेच ह्या किल्ल्याचा इतिहासात काही ठिकावी उल्लेख सापडतो  १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता असा उल्लेख ऐतिहासिक कागद्पत्रामध्ये आढळतो. नंतर १८१८ च्या सुमारास इंग्रजांनी जुन्नर मधले अनेक किल्ले वर हल्ले करून ते नेस्तनाबूत केले गेले. हडसरवर सुद्धा इंग्रजांनी हल्ला चढला व त्याच्या अनेक वस्तू नष्ट केल्या गेल्या.

मार्ग - पुणे ते जुन्नर एस टी व खाजगी गाडीने हडसर गावापर्यंत जाऊ शकतो.
          मुंबई ते जुन्नर एस टी ने  येताना आळे फाटा, ओतूर , अहमदनगर ह्या एस टी ने सितेवाडी फाट्यावर             उतरावे व खाजगी वाहनाने हडसर गावापर्यंत येतात येईल.   

सोमवार, ३० मार्च, २०२०

किल्ले रोहिडगड( विचित्रगड )

                     किल्ले रोहिडगड( विचित्रगड ) 

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये रोहिडगड उर्फ विचित्रगड हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून हा किल्ला समुद्रसपाटी पासून ३६६० फीट उंचीवर आहे. हा एक गिरिदुर्ग आहे. पुण्यापासून साधारणपणे ६० कि.मी. अंतरावर आहे. गडाच्या पायथ्यशी बाजारवाडी हे एक गाव आहे. हे गाव भोर पासून साधारणपणे ७ कि.मी. अंतरावर आहे. बाजारवाडी पर्यंत एस टी ची सोय असून खाजगी वाहनाने सुद्धा जाता येते. गडावर जाताना भोर मध्ये हॉटेल्स उपलब्ध आहे. बाजारवाडीला सुद्धा तुम्हाला छोटे छोटे हॉटेल्स आहे. तेथे तुम्ही नास्ता करून शकता.
गडाची चढाई बाजारवाडीच्या हायर सेकंडरी शाळे पासून गडावर चढाई सुरु होते. हा मार्ग सोपा व सोयीचा आहे. ह्या मार्गाने साधारणतः तासभर चढाई नंतर तुम्ही गडाच्या प्रवेशद्वार पर्यंत पोचता. त्यावर गणेश पट्टी व मिहरब आहे. काही पायऱ्या चढल्यावर गडाचे दुसरा दरवाजा लागतो. ह्या दरवाजा जवळच एक पाषाणात कोरलेले पाण्याचे ताक आहे. दुसऱ्या दरवाजाचे सिंह व शरबाचे शिल्प कोरलेले आहे. काही पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा तिसरा दरवाजा लागतो. ह्या दरवाज्यावर हत्तीचे शिल्प आहे व दुसऱ्या बाजूस मराठी व पारशी भाषेत शीला लेख आहे. या गडावर दोन वास्तू  सदर तर दुसरी किल्लेदाराचे घर असावे. पुढे गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैरोबाचे मंदिर व त्यासमोर लहानसे टाक व एक दीपमाळ आहे. हा किल्ला तसा आकाराने लहान आहे. हा किल्ल्याला एकूण ६ बुरुज आहेत. शिरवळ, पाटणे, दामगुडे , वाघजाई, फत्ते व सदरेचा बुरुज
आहे.




ह्या किल्ल्याचा इतिहास पाहता हा यादवकालीन असून तिसऱ्या दरवाजावरील शिलालेखानुसार बिजारपूरचा मोहम्मद आदिल शाह याने गडाची पुनबांधणी केली. १६५६ साली हा किल्ला शिवाजी महाराजांनी रोहिडाचे देशमुख बांदल ह्यांना धारातीर्थी पडून स्वराजात सामील करून घेतला. देशमुख बांदल हयांचे वरिष्ट अधिकारी बाजीप्रभू देशपांडे यांना स्वराजाच्या मोहिमेत सामील करून घेतले. पुढे  १६६५ रोजी पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलच्या ताब्यात गेला परुंतु १६७० रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराजात सामील करून घेतला.




मार्ग - या गडावर जाण्यासाठी दोन बाजूनी मार्ग आहेत. एक बाजारवाडी मार्गे तर दुसरा चिखलावडे मार्ग
चिखलावडे मार्गातून जाताना दोन मार्गे आहेत पण ते घोडे अवघड आहेत. ट्रेकसाठी या मार्गाचा उपयोग करतात.

   १) बाजारवाडी मार्ग - बाजारवाडी पर्यंत जाण्यासाठी एस टी सेवा उपलब्ध आहे बाजारवारी पासून मळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून प्रवेश द्वारपर्यंत तास भरात घेऊन जाते. गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करतात. ती वाट लॅबची व निसरडी या वाटेने गडावर जाण्यास अडीच तास लागतात.
   २) चिखलवाडे मार्ग - चिखलवे खुर्द येथून टप्प्याचे नाकडं मार्ग किंवा चिखलावे ब्रुद्रुक येथून भैरवनाथ मंदिर मार्ग या गडावर जात येते हा मार्ग कठीण आहे. 

किल्ले घनगड

किल्ले घनगड 



महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले घनगड हा पुणे जिल्ह्यातील एक किल्ला असून हा एक दुर्गागिरी आहे. हा गड समुद्रसपाटीपासून ३००० फीट उंचीवर असून पुण्यापासून ह्याचे अंतर साधारणतः १०० कि.मी. आहे. लोणावळा खंडाळ्यापासून साधारणपणे ३० कि.मी. आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या तैलबैला या डोंगररांगात वसलेला आहे. हा गड दुर्गम भागात मोडत असल्यामुळे त्याचा इतिहास उपलब्ध नाही. ह्या गडाचा इतिहास ३०० वर्षा पासून उपलब्ध आहे. शिवाजी महाराजांनी १६५७ साली जेव्हा घाटातील भाग स्वराजात सामील घेण्यास सुरवात केली तेव्हा हा गड स्वराजात सामील केला गेला असावा. ह्या गडाचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी व  कोकण-पुणे व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरत. हा किल्ला १८१८ पर्यंत स्वराजात होता. कोरीगड इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला. 

                                  

या गडावर येण्यासाठी लोणावळा मार्गाने व त्याच प्रमाणे ताम्हिणी घाट मार्ग येऊ शकता गडाच्या पायथ्याशी एकोले गाव असून ह्या गडावर जाण्यासाठी ह्या गावामार्गे यावे लागते. ह्या गडावर येताना तुम्हाला लोणावळा किंवा पेठे शहापूर या ठिकाणी छोटे हॉटेल्स आहेत. हा ट्रेकिंग साठी उपयुक्त आहे. घनदाट झाडीमधून या गडावर येण्यासाठी वाट आहे. एकोले गावातून अर्धा तासात गडाच्या प्रवेशद्वार पर्यंत पोचता येते. इंग्रजांच्या हल्ल्यात ह्या किल्ल्याची पडझड झाली आहे. गडाच्या पायऱ्या नष्ट केल्या गेल्या परंतु शिवाजी ट्रायल ग्रोउपने हे सेवाभावी संस्थेने गावकर्यांच्या मदतीने हा गडाची दुरुस्ती केली आहे. उदा. ज्या ठिकाणी पायऱ्या उपलब्ध नाही तेथे लोखंडी शिड्या लावल्या गेल्या आहे. गडाच्या प्रवेशद्वार जवळच गिरजाई देवीचे मंदिर आहे. ह्या किल्ल्यात दोन दरवाजे आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी लोखंडी शिडी आहे. गडाच्या दुसऱ्या गेट जवळ पाण्याचे टाक आहे. बालेकिल्ल्याच्या वास्तू ची पडझड मुळे त्याचे केवळ अवशेष उपलब्ध आहे. ह्या गडावर काळ्या पेशंट कोरलेल्या अनेक गुहा आहेत.  ह्या गडाच्या बालेकिल्ल्यावरून तेलबेला, कोरीगड, मुळशी धरण व सुधागड सरसगड व कोकणातील अनेक वाट दिसतात. 


                               

मार्ग- पुण्याहून पौड - मुळशी -ताम्हिणी मार्गे  किंवा लोणावळा मार्गे येता येते. 
          मुंबईवरून लोणावळा मार्गे एकोले पर्यंत येता येते. 

रविवार, २९ मार्च, २०२०

किल्ले पुरंदर

                              किल्ले पुरंदर


महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले पुरंदर पुणे जिल्यातील पुरंदर तालुक्यात असून त्याची समुद्रसपाटी पासून ४४४२ फीट असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. हा एक गिरिदुर्ग असून छत्रपती संभाजी राजे यांचे जन्म स्थान आहे. पुरंदर किल्ल्याचें नाव पुरंदर नावाच्या गावावरून पडले जे किल्ल्याच्या सर्वात जवळचे आहे. पुरंदर च्या लागूनच वज्रगड नावाचा किल्ला आहे. हा किल्ला आता मिलिटरी च्या ताब्यात असून येथे मिलिटरी चे ट्रेनिंग सेंटर असून वज्रगड सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे तर पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी स्वतःचा आई डी प्रूफ असल्याशिवाय आत जात येत नाही. गडावर चढण्यासाठी पायऱ्या असल्याने हा चढण्यास सोपा आहे. गडावर जाण्याचा टाईमिंग आहे सकाळी ९ ते ५. गडावर पहिल्यांदा लागते ते प्रवेशद्वार सर दरवाजा व नंतर लागतो तो केदार दरवाजा आहे. ह्या दरवाजाकडून पुढे गेल्यास बाल्लेकिल्ला आहे. किल्ल्यावर बोर पाण्याचे टाक आहे. विहिरी आहेव बालेकिल्ल्यात केदारेश्वराचे मंदिर आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. पुरंदरेश्वर मंदिर आहे.रामेश्वराचे मंदिर, खंदकडा पद्मवति तळे, शेंदऱ्या बुरुज, पुरंदर माची, भैरवगड, वीर मुरारबाजी यांचा पुतळा आहे.  ह्या गडाच्या नावाची एक आख्खायीकां आहे पुरंदर म्हणजे इंद्रपर्वत हनुमान जेव्हा दोनाद्री पर्वत उचलून नेला तेव्हा त्याचे काही तुकडे पडले तोच हा पर्वत होय

पुरंदर किल्ल्याचा इतिहास हा ११ व्या शतकातील यादवांच्या काळातील असून पुढे हा किल्ला पर्शियन आक्रमण कर्त्यांनी त्याच्या ताब्यात घेतला. पुढे या पर्शियन आक्रमणकर्त्याने १३५० रोजी पुरंदराच्या तटबंदीचे बांधकाम केले. नंतर तो बिजापूर अहमदनगर राज्यवटीत राहिला  इ.स. १५९६ रोजी अहमदनगरचा सुलतान बहादुरशहा मालोजी भोसले यांना 'पुणे' आणि 'सूप' ची जहागिरी दिली. (मालोजी भोसले हे शिवाजी महाराजांचे आजोबा ) इ.स. १६४६ रोजी शिवाजीमहाराजांनी पुरंदरवर हल्ला करून मराठा साम्राजात पुरंदर किल्ला समाविष्ट करून घेतला. इ. स. १६६५ औरंगज़ेबच्या सरदार मिर्जाराजे जयसिंग व दिलेरखान ने पुरंदरला वेढा मारला तेव्हा पुरंदर किल्लेचा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे हे शत्रूशी लढा देत धारातीर्थी पडले. शेवटी शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. त्या महाराजांनी २३ किल्ले व ४ लाख होन दिले. परंतु पाच वर्षातच महाराजांनी पुन्हा पुरंदरसह सर्व किल्ले जिंकले. १४ मे १६५७ रोजी संभाजीराजांचा जन्म पुरंदरावर झाला. ह्या किल्ल्यावर त्यांनी नखशिखांत, नायिकाभेद, सातशतक व बुधभूषण हे ग्रंथ लिहले.
                              
मार्ग -
  1. पुण्याहून: पुण्याहून ३० कि. मी. अन्तरावर असणार्‍या सासवड या गावी यावे लागते.
  2. सासवडहून: सासवडहून सासवड - भोर किंवा सासवड नारायणपूर ही गाडी घेऊन नारायणपूर गावाच्या पुढे असणार्‍या 'पुरन्दर घाटमाथा' या थाम्ब्यावर उतरतात. हा घाटमाथा म्हणजे पुरन्दर किल्ला आणि समोर असणारा सूर्यपर्वत यामधील खिण्ड होय. या थाम्ब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते. ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरन्दर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो.
नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडीरस्ता थेट किल्ल्यापर्यन्त गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडीरस्ता. या रस्त्याने चालतचालत गड गाठण्यास २ तास पुरतात. तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एका तासात माणूस पुरन्दर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहोचतो.

किल्ले मनोरंजन (राजमाचीचा बाल्लेकिल्ला )

किल्ले मनोरंजन (राजमाचीचा बाल्लेकिल्ला  )


महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले मनोरंजन  दोन बालेकिल्ल्या पैकी एक आहे.  पुण्यातील मावळतालुक्यात असून लोणावळ्याच्या बोर घाटात असून हा के गिरिदुर्ग आहे. हा किल्ला समुद्रसपाटी पासून २७०० फिट उंचीवर आहे. राजमाची लोणावळ्या पासून १५ कि. मी. अंतरावर आहे. लोणावळ्यावरून चालत चालत तीन ते साडे तीन तास लागतात व कोंढाणे गावा मार्गे आल्यास मात्र ट्रेकिंग करून दोन तासात राजमाचीला पोचता येते. पावसाळ्या व्यतिरिक्त इतर काळात लोणावळ्या पासून उधेवाडी पर्यंत टाटा सुमो, महेंद्रा बुलेरो या सारख्या गाड्या ज्या उंचीने जास्त आहे. ते गडाच्या पायथ्याशी असणारे उधेवाडी पर्यंत जाता येते. मारुती ८०० किंवा इंडिका ह्या सारख्या गड्याने उधेवाडी पर्यंत येऊ नये. राजमाची गडाच्या पायथ्याशी कोंढाणा लेणी असून ती इ. स. २०० पूर्वी राजमाची गडाच्या अधिपत्ते खाली झाली असावी त्या वरून ह्या गडाचे निर्माण आणि महत्व आपणास समजते.

उढेवाडीत आल्यावर तुम्हाला उदयसागर तलाव दिसतो व पुढे गेल्यावर गोधनेश्वर मंदिर दिसते. गावातून मनोरंजन  किल्ल्यावर जाण्यासाठी तास ते सव्वा तास लागतो. राजमाची गडाला दोन बालेकिल्ले आहेत. श्रीवर्धन आणि मनोरंजन ह्या किल्ल्याच्या पायथाशी कालभैरवाचे मंदिर आहे.
मनोरंजन हा किल्ला श्रीवर्धन किल्ल्यापेक्षा कमी उंचीवर असून तो आकारमानाने सुद्धा छोटा आहे. प्रवेशद्वाराने आत प्रवेश केल्यास सैनिकाच्या दोन दिवड्या आहेत. गडावर चार पाण्याचे टाक हाये. गडावर अनेक वास्तूचे अवशेष दिसून येतात गडावरुन माथेरान डोंगररांगेचा ढाक किल्ला, भीमाशंकर किल्ला कर्नाळा, प्रबळगड दिसतात


ह्या किल्ल्याचे महत्व म्हणजे कल्याण नरसोपारा बंदराचा माल बोर घाट मार्गे जायचा या मार्गावर लक्ष राहण्यासाठी तसेच महसूल लीच्या दृष्टीने ह्या गडांचे महत्व ओळखून शिवाजी राजांनी सण १६५७ रोजी कल्याण व भिविण्डी परिसर व बोर घाटतील सर्व किल्ले स्वरजात सामील केले पुढे हा किल्ला कित्येक काळ मराठा साम्राजचा भाग होता इ.स. १७१३ रोजी शाहू महाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या कडे दिला. १७३० रोजी हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्या कडे हा किल्ला आला व पुढे इ.स. १७७६ ला सदाशीवराव तोतया यांनी समस्त कोकण प्रांत काबीज केला तेव्हा त्याने हा किल्ला हि ताब्यात घेतला व कोकणात वर्चस्व वाढवले परंतु पुढे पेशवाणी हा किल्ला परत काबीज केला पण पुढे १८१८ रोजी इंग्रजांनी हा किल्ला जिंकला
मार्ग  - पुणे ते राजमाची 85 कि.मी. लोणावळा पर्यंत रेल्वेने व पुढे चालत किंवा भाड्याने
           मुंबई ते राजमाची ९५ कि.मी. लोणावळा पर्यत रेल्वेने व पुढे चालत किंवा भाड्याने

किल्ले श्रीवर्धन (राजमाची बालेकिल्ला )

किल्ले श्रीवर्धन (राजमाची चा  बालेकिल्ला )


महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले श्रीवर्धन राजमाचीच्या दोन बालेकिल्ल्या पैकी एक आहे.  पुण्यातील मावळतालुक्यात असून लोणावळ्याच्या बोर घाटात असून हा के गिरिदुर्ग आहे. हा किल्ला समुद्रसपाटी पासून ३००० फिट उंचीवर आहे. राजमाची लोणावळ्या पासून १५ कि. मी. अंतरावर आहे. लोणावळ्यावरून चालत चालत तीन ते साडे तीन तास लागतात व कोंढाणे गावा मार्गे आल्यास मात्र ट्रेकिंग करून दोन तासात राजमाचीला पोचता येते. पावसाळ्या व्यतिरिक्त इतर काळात लोणावळ्या पासून उधेवाडी पर्यंत टाटा सुमो, महेंद्रा बुलेरो या सारख्या गाड्या ज्या उंचीने जास्त आहे. ते गडाच्या पायथ्याशी असणारे उधेवाडी पर्यंत जाता येते. मारुती ८०० किंवा इंडिका ह्या सारख्या गड्याने उधेवाडी पर्यंत येऊ नये. राजमाची गडाच्या पायथ्याशी कोंढाणा लेणी असून ती इ. स. २०० पूर्वी राजमाची गडाच्या अधिपत्ते खाली झाली असावी त्या वरून ह्या गडाचे निर्माण आणि महत्व आपणास समजते.


उढेवाडीत आल्यावर तुम्हाला उदयसागर तलाव दिसतो व पुढे गेल्यावर गोधनेश्वर मंदिर दिसते. गावातून श्रीवर्धन किल्ल्यावर जाण्यासाठी तास ते सव्वा तास लागतो. राजमाची गडाला दोन बालेकिल्ले आहेत. श्रीवर्धन आणि मनोरंजन ह्या किल्ल्याच्या पायथाशी कालभैरवाचे मंदिर आहे.
श्रीवर्धन बाल्लेकिल्ल्यावर प्रवेशद्वाराने प्रवेश केल्यास दोन्ही बाजूस बुरुज दिसतात. अनेक पुरातन वास्तूचे अवशेष दिसतात. ह्या किल्ल्या भोवती दुहेरी तटबंदी आहे. त्यात चिलखती बुरुज आहे. दोन पाण्याचे टाक आहेत. श्रीवर्धन किल्ल्याच्या वरच्या बाजूस पोचण्यासाठी पाषाणात कोरलेल्या पायऱ्याने वर गेल्यास आपलेला धान्याचे कोठार दिसते


ह्या गडावरून एका बाजूस तुंग, त्रिकोणां, लोहगड, विसापूर तर दुसऱ्या बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी हा परिसर दिसतो. श्रीवर्धन किल्ल्याचे नाव श्रीवर्धन गणपतराव पटवर्धन या नावावरून पडले.
ह्या किल्ल्याचे महत्व म्हणजे कल्याण नरसोपारा बंदराचा माल बोर घाट मार्गे जायचा या मार्गावर लक्ष राहण्यासाठी तसेच महसूल लीच्या दृष्टीने ह्या गडांचे महत्व ओळखून शिवाजी राजांनी सण १६५७ रोजी कल्याण व भिविण्डी परिसर व बोर घाटतील सर्व किल्ले स्वरजात सामील केले पुढे हा किल्ला कित्येक काळ मराठा साम्राजचा भाग होता इ.स. १७१३ रोजी शाहू महाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या कडे दिला. १७३० रोजी हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्या कडे हा किल्ला आला व पुढे इ.स. १७७६ ला सदाशीवराव तोतया यांनी समस्त कोकण प्रांत काबीज केला तेव्हा त्याने हा किल्ला हि ताब्यात घेतला व कोकणात वर्चस्व वाढवले परंतु पुढे पेशवाणी हा किल्ला परत काबीज केला पण पुढे १८१८ रोजी इंग्रजांनी हा किल्ला जिंकला

मार्ग  - पुणे ते राजमाची 85 कि.मी. लोणावळा पर्यंत रेल्वेने व पुढे चालत किंवा भाड्याने
           मुंबई ते राजमाची ९५ कि.मी. लोणावळा पर्यत रेल्वेने व पुढे चालत किंवा भाड्याने 

किल्ले जंजिरा

किल्ले जंजिरा



महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात असून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला असणाऱ्या अरबी समुद्रात हा जंजिरा किल्ला असून हा एक जलदुर्ग असून हा किल्ला मुंबई पासून १४० कि.मी. व पुण्यापासून १५० कि.मी. आहे. ह्या किल्ल्याला अलिबाग किंवा रोहा मार्ग जाता येते. मुरुड बीच वरून ४ कि. मी, अंतरावर राजपुरी गाव आहे तेथून किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीची सोय आहे. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतला असून त्याचा अर्थ 'बेट' होतो. जंजिऱ्याचे प्रवेश द्वार ने आत गेल्यास त्याच्या तटबंदीची भक्कम बांधणी आपल्याला अजूनही समजते.


किल्ल्यावर वर एक कलाल बांगडी तोफ ही पंचधातूची आहे. दुसरी आहे गायमुख तोफ . तिसरी चावडी तोफ आहे. ह्या तोफेचा पल्ला ६ ते १० कि.मी. दूर होता. किल्ल्यावर घुमटीचे अनेक वस्तू पाहावयास मिळतात. दर्या दरवाजा /चोर दरवाजा आहे संकट काळी बाहेर पडण्यास करत असतात. तिसरा दरवाजा किल्ल्याच्या मागील बाजूस आहे. किल्ल्याच्या मध्य भागी सुरुल खानाचा  ७ मजली भव्य होता किल्ल्या मध्ये पूर्वी तीन मुहल्ले होते. किल्ल्यावर एक शाही तलाव आहे. तलावाच्या बाजूलाच राणीचे शिश महल होता. किल्ल्याला एकूण १९ बुलंद बुरुज आहे. तलावाच्या बाजूला बालेकिल्ल्या आहे. किल्ल्यावर कित्येक तोफा आहे. किल्ल्यावर एक मंदिर आहे हा किल्ल्या ३३० वर्ष हा किल्ला जुना आहे.



ह्या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. ह्यात कोळी लोक राहत. राम पाटील हा त्यांचा प्रमुख होता. हा ठाणेदाराला जुमेनासा झाला. ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरम खान ची नेमणूक केली. पिरम खान ने दारूच्या व्यापारी असल्याचे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली त्याने दारूचे पिंप बेटावरती भेट दिल्या. पिरम खानने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. व ते पाहण्यासाठी तो भरपूर दारूची पिप घेऊन मेढेकोटावर गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन नशेत असताना त्याने सर्वांची कत्तल केली. व मेढेकोट ताब्यात घेतला. पुढे पिरम खानच्या जागी बुऱ्हाणखानची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. अत्ताच जो जंजिरा आहे तो पिरम बुऱ्हाणखाने बांधलेला आहे. व पुढे इ. स. १६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली.  जंजिरेचे सिद्धी हे मूळचे आफ्रिकेतले. ह्या किल्ल्यावर अनेक राजांनी हल्ले केले पण यशस्वी होऊ शकले नाही. असा हा अजिंक्य किल्ला ३ एप्रिल १९४८ साली स्वतंत्र भारतात सामील झाला.


मार्ग 

शनिवार, २८ मार्च, २०२०

किल्ले कोरीगड

                            किल्ले कोरीगड 

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले कोरीगड हे पुणे जिल्यातील मावळ तालुक्यात असून  गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटी पासून १०१० मी. उंचीवर आहे. पुण्यापासून साधारणतः ७७ ते ११० कि. मी. अंतरावर असून किल्ले कोरीगडला जाण्यासाठी तीन चार मार्ग आहेत त्या निवडलेल्या मार्गा नुसार अंतर कमी जास्त होत असते. त्या पैकी लोणावळा वरून २६ कि. मी. अंतरावर असलेले पेठे शहापूरला किंवा आंबवणे गाव हे किल्ले कोरीगडच्या पायथ्याशी आहे. येथे उतरून गडावर जाता येते. गडाला जाण्यासाठी लोणावळा वरून आंबी व्हॅली बसने पेठे शहापूर उतरता येते.
 पेठे शहापूर मार्गे गडावर जाण्याच्या मार्ग आंबवणे गावातून जाण्याऱ्या मार्गापेक्षा सोपा आहे. गडावर जाताना आंबी व्हॅली चा परिसर दिसतो. गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. जाताना प्रथम एक गणेश मंदिर दिसते व काळ्या पाषाणात कोरलेली गुहा असून त्यात एक पाण्याचे टाक आहे. पुढे गेल्यावर गडाचे प्रवेशाद्वार गणेश दरवाजा लागतो तो नवीन दरवाजा बसवण्यात आलेला दिसतो. गडाच्या तटबंदीची काही ठिकाणी पुनर्बांधणी केलेली दिसते. गडावर कोराई मातेचे मंदिर आहे ह्या वरूनच ह्या गडाचे नवे कोरीगड पडले असावे. गडावर अनेक पाण्याचे टाक्या आहे. गडावर एकूण ६ तोफा असून 'लक्ष्मी' तोफ सर्वात मोठी तोफ दिसते



गडावरून टायगर पॉईंट, राजमाची, तुंग किल्ला, पवना धरणाचे जलाशय आंबी व्हॅली परिसर दिसतो. हा गडाचा इतिहास जास्त उपलब्ध नसून पहिला निजाम मलिक अहमद याने हा किल्ला कोळी राजाकडून जिंकला. पुढे शिवाजी महाराजांनी १६५७ रोजी भिविण्डी व कल्याण परिसर जिंकल्या नंतर हा किल्ला सुद्धा स्वराजात सामील केला. व नंतर १८१८ रोजी  हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
मार्ग - पुणे ते लोणावळा रेल्वेने किंवा एस. टी  व लोणावळा ते पेठे शहापूर पर्यंत एस टी किंवा खाजगी बसने
         पुणे ते पौड व तेथून आंबी व्हॅली मार्ग आंबवणे किंवा पेठे शहापूर ला खाजगी मार्गाने 

किल्ले तिकोना

                            किल्ले तिकोना




महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले तिकोना उर्फ वितंडगड हा पुणे जिह्यातील मावळ तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून साधारणपणे ११०० मी. आहे. पुण्यापासून साधारणपणे ७० कि.मी दूर आहे. ह्या किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे त्याला तिकोना असे नाव पडले असावे. तिकोना गडाच्या पायथ्याशी तिकोना पेठ आहे आणि ह्या पेठेतून गडावर जाण्यासाठी मार्ग आहे. खाजगी वाहन थेट किल्ल्याच्या पायथ्याशी येते या किल्ल्या आकाराने अरुंद असल्यामुळे त्याचा वापर टेहळणी साठी केला जातो. ह्या किल्ल्यावरून पवना धरणाचे जलाशय, तुंगगड, मोरगिरी किल्ला दिसतो. या गडाच्या पायथ्याशी गडद लेणी आहे.


गडावर जाताना जसजस वरती जाऊ तसतसे मार्ग आखूड होते त्यामुळे ह्या गडाची चढाई थरारक बनते. गडाची पहिली देवळी काही पडक्या अवस्थेत आहे. पुढे गेल्यावर वेताळ दरवाजाने आपण प्रवेश करतो त्याच्या बाजूला असलेला पठाराच्या बाजूला एक बुरुज आहे त्याला वेताळ बुरुज म्हणत असतील वेताळ दरवाजा पुढे गेल्यावर गडावर एक चपटदार मारुतीचे मूर्ती दिसते. मारुतीच्या मूर्ती पुढे गेल्यावर अनेक वास्तूचे अवशेष दिसतात व तेथे तुळजाई मंदिर आहे ते एक सातवाहन कालीन लेणं आहे. गड बांधणीसाठी लागणार घाना सुद्धा आहे व त्यापुढे बालेकिल्ल्यात जाण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. बाले किल्लावर पोहचल्यावर बालेकिल्ल्यावर पोहचल्यावर त्रिंबकेश्वर मंदिर आहे.

ह्या  गडाचा इतिहास फार जुना दिसत नाही पहिला निजाम मलिक अहमदच्या ताब्यात हा होता  १६५७ च्या आसपास जेव्हा भिविण्डी व कल्याण परिसर जिंकला तेव्हा हा गड स्वराजात आला. हा किल्ला नेताजी पालकरांच्या ताब्यात दिला परंतु पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला परंतु ५ वर्षातच हा गड पुन्हा स्वराजात आला
मार्ग - त्रिकोणां किल्ला हा रेल्वेस्टेशन कामशेत २६ कि. मी. असून पुण्यापासून कामशेत ५१ कि. मी. आहे. तेथून पेठे पर्यंत खाजगी वाहनांने सरळ ह्या त्रिकोना पेठेत जात येते.

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

किल्ले तुंग

तुंगकिल्ले  





महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले तुंग म्हणजेच कठीणगड हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक किल्ला आहे. हा एक गिरिदुर्ग असून त्याची समुद्रसपाटीपासून अंदाजे १०७५ मी. आहे. पुण्यापासून साधारणपणे ६० कि. मी तर लोणावळ्या पासून साधारणपणे २० कि. मी. अंतरावर आहे. मळवली पासून साधारणपणे १२ कि. मी. अंतरावर आहे. ह्या गडाच्या तिन्ही बाजूने पवना धरणाचे जलाशयने वेढलेला असून ह्या जलाशयात विविध वॉटर ऍक्टिव्हिटीएस चालू आहे. गडाच्या पायथ्याशी तुंगवाडी हे गाव आहे. ह्या गावापासून ४०० मी ची चढाई करून ह्या गडावर पोचता येते. 

हा  गडा कॉनिकल शेप असून तीव्र उताराच्या खोल दऱ्या आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी ह्या गडाचे नाव बदलून कठीणगड केले असावे. ह्या गडावर चढताना अनेक गृहा आहे. प्रवेशद्वार नंतर दुसरा प्रवेशद्वार हा गोमुखी पद्धतीचा बांधकाम असलेला आहे. आत गेल्यावर गणेश मंदिर आहे. त्यापुढे गेल्यावर शिवकालीन पाण्याचे तळ आहे. अजून पुढे गेल्यावर न्यायनिवाडा करण्याची जागा आहे. या गडावर अनेक महालाचे अवशेष आहे. किल्ल्यावर तुंग देवीचे मंदिर आहे. ह्या देवीवरून ह्या किल्ल्याचे नाव तुंग गड पडले असावे. किल्ल्यावर चार बुरुज असून छोटीखानी बालेकिल्ला पडक्या अवस्थेत आहे. ह्या बालेकिल्ल्यावरून लोहगड, विसापूर, तिकोना, कोरीगड दिसेल. 
ह्या गडाच्या इतिहासाप्रमाणे इ. स. १६०० च्या काळात आदिलशहाने ह्या गडाचे निर्माण केले शिवाजी महाराजांनी १६५७ च्या आसपास जेव्हा भिविण्डी व कल्याण परिसर जिंकला तेव्हा हा गड स्वराजात आला. हा किल्ला नेताजी पालकरांच्या ताब्यात दिला परंतु पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला परंतु ५ वर्षातच हा गड पुन्हा स्वराजात आला. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा किल्ला औरंगझेबाच्या ताब्यात गेला परंतु त्याच्या मृत्यू नंतर मराठ्यांनी तोच पुन्हा जिंकून स्वराज्यात आला. 
हा किल्ल्या छोटा असून ह्यामध्ये २०० सैनिकच राहू शकतात. त्यामुळे हा किल्ला मुख्य करून टेहळणी साठी वापरण्यात येत असावा. ह्या किल्ल्यावरून बोरघाट मार्गी येणाऱ्या शत्रूवर नियंत्रण व लक्ष ठेवण्यासाठी वापरत असत व तसेच मुळशी व मावळ प्रांतातील परिसराचे  व तसेच लोहगडाच्या संरक्षण करण्यासाठी होता. अससी हा किल्ला पाहण्यासाठी तसेच पवना धरणाचे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी एकदा तरी ह्या गडाला भेट द्या पण गडावर चढाई करताना विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. 
मार्ग - लोणावळ्या मागे २० कमी रस्त्याच्या मार्गाने यावे लागेल. 
          पुणे मार्गे ६० कमी रस्त्याने यावे लागेल . 
          पुण्या-मुंबईवरून रेल्वेने मळवली स्टेशन ला उतरून १२ कि. मी. रस्त्याने यावे लागेल
          तुंग गावात यावे लागेल. 

किल्ले विसापूर

                             किल्ले विसापूर


महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये  विसापूर म्हणजेच संबळगड पुण्यापासुन साधारणतः ५० कि. मी. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुलुक्यात असून पवनमावळात डोंगररांगेत वसवलेला हा एक गिरीदुर्ग. लोहगड आणि विसापूर हे दोन्ही गड एकमेकांच्या लागत आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही गडाचा इतिहास अलग करणे अशक्य. ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ३५०० फूट विसापूर किल्ल्याला जाताना मळवली हे रेल्वे स्थानक लागते. तेथून भाजेगावातून ह्या किल्ल्याचे दर्शन होते.  किल्लाकडे भाजे मार्गाने गेल्या बुद्धकालीन लेणी पाहावयास मिळते. भाजे गावातून चालत चालत तासभर लागतो. दुसरा मार्ग तो गायमुख खिंडीतून ह्या मार्गाने जाताना एक पाषाणात कोरलेली पाण्याच्या टाकी पाहावयास मिळते.
विसापूर किल्ला लोहगडावरून उंचावर व विस्ताराने ही मोठा किल्ला आहे ह्या गडाला दोन प्रवेश द्वार असून उत्तरेकडील दिल्ली दरवाजा व दक्षिणेकडील कोकण दरवाजा परंतु आता मात्र ते पडलेल्या स्थितीत पाहावयास मिळतात. परंतु त्यांवरून ह्या किल्ल्याची भव्यतेची कल्पना येते. गडावर अनेक पाण्याचे टाक्या आहेत मारुतीचे देऊळ एक मोठा जात आहे. गडावरुण लोहगड तिकोना,तुंग गड व पावन धरण पाहावयास मिळते. विसापूर हा किल्ला कोणी बांधला याचा नोंद नाही परंतु सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य,निजाम, मुगल, मराठे व पेशवे ह्यांच्या अधिपत्या खाली होता. ह्या गडाच्या भवताली अनेक बुद्धकालीन लेण्या आहेत त्यावरून ह्या किल्लाच्या प्राचीनतेचा अंदाज काढला जातो.

छत्रपती शिवाजीमहाराजनी १६५७ साली जेव्हा कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला तेव्हा हा किल्ला ही स्वराजात सामील झाला पुढे १६६५ पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या हाती गेला व नंतर १६७० साली मराठ्यांनी पुन्हा हा गड स्वरजात आणला. शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर १६८२ मध्ये मराठे आणि मुघल ह्याच्या मध्ये अनेक युद्ध झाले. छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यू नंतर हा किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला परंतु १७१३ रोजी सरखेल कान्होजी आंग्रे यांनी या किल्ला पुन्हा स्वराजात दाखल केला. सण १७२० च्या आसपास पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याशी मसलत करून राजमाची सोडून सर्व किल्ले शाहू महाराजांच्या देण्यात आले. याच काळात बाळाजी विश्वनाथ ह्या किल्ल्याची बांधकाम केल्याचे उल्लेख आढळतो पेशवे ह्या किल्ल्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी करत.   पुढे १८१८ रोजी इंग्रजांनी विसापूर वर हल्ला करून जिंकला व दुसऱ्याच दिवशी लोहगड  किल्ला पेशव्यानी सोडून दिला ह्यावरून या किल्ल्याचे महत्व लोहगडाच्या संरक्षणा च्या  दृष्टीने किती होते याचा अंदाज बांधता येऊ शकतो.  लोहगडला आल्यावर आवर्जून हा गड पाहण्या जोगा आहे


मार्ग - मळवली या रेल्वेस्टेशनने उतरून तेथून भाजेगावातून दोन मार्ग आहे
१) भाज्या लेण्यामार्गे                    २) भाजेगावातून गायमुखी खिंडीतून डावीकडे वळावे
पाटण गावातून विसापूर किल्ल्याला जाण्यासाठी मार्ग आहे  

किल्ले लोहगड

किल्ले लोहगड

 
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले लोहगड  दुर्गगड  असून हा पुंणे जिल्यातील मावळ तालुक्यातील मावळ डोंगररांगात वसलेला आहे. पुण्यापासून साधारणतः ५० कि. मी  व लोणावळ्यापासून १० कि. मी. आहे. मलवली रेल्वेस्टेशनला उतरून  ह्या गडावर जातात येईल.  त्याची समुद्रसपाटीपासून १३३० मी उंचीवर आहे. गडावर जाताना पवना धरणाचे निसर्गरम्य दृश्य पाहावयास मिळते.

गडावर गेल्यावर सर्वप्रथम गडाचा प्रवेश द्वार 'गणेश' दरवाजा पाहावयास मिळतो. दुसरा दरवाजामहादरवाजा असून त्यानंतर तिसरा दरवाजा  दिंडी  दरवाजा आहे. चौथा  दरवाजा नारायण दरवाजा आहेव पाचवा दरवाजा  हनुमान दरवाजा आहे. गडाच्या भक्कम तटबंदीमुळे ह्या गडाला 'लोहगड' असे नाव पडले. गडावर अष्टकोनी व सोळाकोनी तलाव आहे. शिवकालीन सभागृह आहे. महादेवाचे मंदिर, त्र्यंबक तलाव लक्ष्मी कोटी आहे. घोड्याच्या पागा आहे गडावर एकूण ४० पाण्याच्या टाक्या आहे. विंचू कडा हा आकर्षक व निसर्गरम्य आहे.


लोहगड खूप प्रचीन असून सातवाहन, यादव, चालुक्य, राष्ट्रकूट, निजाम बहमनी, मुगल, मराठा ह्या सत्ता कर्त्यांनी ह्या गडावर राज्य केले आहे. गडावर त्याच प्रमाणे गडाच्या भोवती अनेक लेण्या अस्तित्वात आहे त्यामुळे हा गड किती प्राचीन असावा ह्याचा अंदाज काढता येईल.
मलिक अहमदने निजाम शाहीची स्थापना करताना लोहगड किल्ला काबीज केला सण १६३० साली हा किल्ला आदिलशाहीत गेला. व पुढे१६५७  मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड-विसापूर हा सर्व परिसर स्वराज्यात सामील करून घेतला पण १६६५ साली पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला. पुढे १६७० साली मराठ्यांनी पुन्हा हा गड जिंकून स्वराजात सामील करून घेतला. पुढे  सण १८१८ मध्ये पेशवांकडून हा किल्ला इंगर्जांच्या  ताब्यात गेला.


मार्ग - पुण्यावरून किंवा मुंबई वरून मळवली स्टेशन वरून चालत जाताना साधारणतः दिड सव्वा तास लागेल.  गायमुखी खिंडीच्या अलीकडे लोहगडवाडी तुन किल्ल्याच्या मार्गाने जाता येते.
खाजगी वाहनाने जायचे झाल्यास गडाच्या पायथ्याला लोहगडवाडी पर्यंत जाता येते. 

बुधवार, २५ मार्च, २०२०

किल्ले तोरणा

                                                                        किल्ले तोरणा 




महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असून पुण्यापासून ४० कि.मी आहॆ ह्या गडाची उंची १४००  मी. आहे . हा किल्ला स्वराज्याच्या मोहिमेतील सर्वात महत्वाचा किल्ला आहॆ. म्हणून असे ही म्हणतात तोरणा किल्ला जिंकून महाराजांनी तोरण उभारले. शिवाजीराजांनी वयाच्या १६ वर्षी हा गड सर केला. ह्या गडावर तोरण नावाची झाडे आहेत त्या वरून त्याला तोरणा असे नाव पडले आहे. ह्या किल्ल्याच्या प्रचंड विस्तारामुळे महाराजांनी या गडाचे नाव प्रचंडगड असे नाव पडले. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बह्मणि राजवटीच्या मलिक अहमद याकडे हा किल्ला होता नंतर तो निजामशाहीत गेला पुढे १६४३ साली शिवाजीमहाराजांनी वयाच्या १६ वर्षी हा किल्ला घेतला व ह्या गडाची पुनः बांधणी केली नवीन इमारती बांधल्या संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्यानंतर हा किल्ला मुघलांकडे गेला सण १७०४ रोजी औरंगजेब कडे गेला पंरंतु काही वर्षातच नागोजी कोकाटे यांनी या मराठा सरदाराने पुन्हा हल्ला केला व मराठ्यांच्या ताब्यात घेतला.

गडावरून कनद नदीवरचे गुंजवणे धरणाच्या पाणी दिसते. हा किल्ला कोणी व कधी बांधला गेला ह्याची पुरावा उपलब्ध नाही परंतु या किल्ल्यावर प्राचीन काळाच्या लेण्या आहेत त्या किल्ल्यापेक्षा खूप जुन्या आहॆत. ह्या  किल्ल्यावरून रायगड, राजगड , लिगांणा, पुरंदर, सिहंगड दिसू शकतात. गडावर येण्यासासाठी पायऱ्या आहेत तो दगडकोरून केल्याला दिसतात. गडाचा मुख्य दरवाजा आहे पुढे दुसरा दरवाजा मुखी दरवाजा आहे हा दरवाजा गोमुखी दरवाजा आहे. गडावर काही जुने अवशेष आहे गडावर पाण्याचे एक तळ आहे गडावर मोंगाई व शंकराचे मंदिर आहे. गडाच्या कोकणच्या दरवाज्यावरून बुधला माची कडे जात येते. झुंझार माची कडे जाण्यासाठी लोखंडी शिडीद्वारे जावे लागते. ह्या माची कडे जाण्याचा मार्ग अवघड आहे.


पोहोचण्याचे मार्ग : पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वेल्हेला जाण्यासाठी मुंबई - बंगलोर हायवे वरील नसरापूर फाटा गाठावा. पुण्यापासून नसरापूर ४० किमी वर आहे. नसरापूर वरून वेल्हे गावात जाण्यासाठी जीप मिळतात. नसरापूर ते वेल्हे हे अंतर २९ किमी आहे.